• Download App
    Matin Patel TCS corporate Jihad : निदा खानचा आश्रयदाता नगरसेवक मतीन पटेलच्या घरावर बुलडोझर; पण पटेलला आलिशान घर बांधून द्यायची इम्तियाज जलीलची भाषा!!

    TCS corporate Jihad : निदा खानचा आश्रयदाता नगरसेवक मतीन पटेलच्या घरावर बुलडोझर; पण पटेलला आलिशान घर बांधून द्यायची इम्तियाज जलीलची भाषा!!

    विशेष प्रतिनिधी

    नाशिक : TCS corporate Jihad ची मास्टर माईंड निदा खान हिला आश्रय देणारा छत्रपती संभाजीनगरचा नगरसेवक मतीन पटेलच्या घरावर महापालिका प्रशासनाने आज पहाटे बुलडोझर चालवून ते घर उद्ध्वस्त केले. पण त्यावेळी मतीन पटेलच्या कुटुंबातील सदस्यांनी हातात संविधान घेऊन महापालिका प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांवर फुले उधळून त्यांचे स्वागत केले. माजी खासदार इम्तियाज जलील यांनी मतीन पटेल याला शानदार घर बांधून देण्याची भाषा केली त्यामुळे मतीन पटेल याच्या घरावर फक्त बुलडोझर कारवाई करून भाणार नाही. जिहाद्यांना कायमची अद्दल घडविण्यासाठी बुलडोझर कारवाईच्या पलीकडची कारवाई करावी लागेल, हे स्पष्ट झाले.

    – इम्तियाज जलीलचे बळ

    टीसीएस कॉर्पोरेट जिहादची मास्टर माईंड निदा खान आणि तिच्या कुटुंबीयांना मतीन पटेल याने त्याच्या घरात आश्रय दिला होता. निदा खान ही तब्बल 45 दिवस तिथे राहत होती. तिच्याकडे रेशन पाणी पोहोचविण्याचे काम सुद्धा मतीन पटेल हा त्याचा ड्रायव्हर मार्फत करत होता. कॉर्पोरेट जिहाद मधल्या एका आरोपीला आपण आश्रय देत आहोत हे पूर्णपणे बेकायदेशीर आहे हे त्याला माहिती होते, तरीसुद्धा त्याने ते बेकायदेशीर कृत्य बिनदिक्कतपणे केले. त्याला माजी खासदार इम्तियाज जलील याने बळ दिले. त्यामुळे मतीन पटेल निर्ढावला. त्याने निदा खान हिला आश्रय देणे चालूच ठेवले.

    – बुलडोझर कारवाईच्या पलीकडची कारवाई आवश्यक

    पण त्याचा परिणाम आज मतीन पटेल याला भोगाव लागला. छत्रपती संभाजीनगर महापालिका प्रशासनाने मतीन पटेल याच्या घरावर बुलडोझर चालवून ते पूर्णपणे उद्ध्वस्त केले. तरीसुद्धा मतीन पटेल बधला नाही. त्याने आणि त्याच्या कुटुंबीयांनी महापालिका प्रशासनातील कर्मचाऱ्यांचे हातात संविधान घेऊन आणि त्यांच्यावर फुले उधळून स्वागत केले. याचा अर्थ मतीन पटेलला जिहादी निदा खान हिला आश्रय दिल्याचा कुठलाही पश्चाताप झाला नाही. महापालिका प्रशासनाने मतीन पटेलचे घर बुलडोझर चालवून उद्ध्वस्त केल्यानंतर इम्तियाज जलीलने मतीन पटेलला आलिशान घर बांधून देण्याची भाषा वापरली.

    – जिहाद्यांवर आणखी कठोर कारवाईची गरज

    त्यामुळे इथून पुढे अशा जिहाद्यांवर कारवाई करताना केवळ बुलडोझर कारवाई करून चालणार नाही. बुलडोझर कारवाईच्या पलीकडची कठोर कारवाई करण्याच्या दृष्टीने पावले उचलावी लागतील.

    Corporation initiates the demolition of properties belonging to AIMIM Corporator Matin Patel

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Vinayak Raut : 12 कोटी, 3 बीएचके फ्लॅट न दिल्यामुळेच सुनेचे खोटे आरोप; यामागे षडयंत्र! विनायक राऊतांचा सून गिरीजा राऊत यांच्यावर प्रतिआरोप

    Vinayak Raut : विनायक राऊत यांच्यासह मुलावर सुनेकडून छळाचा आरोप; केस कापले, बळजबरीने गोमूत्र पाजले म्हणत सुनेची पोलिसात तक्रार

    Sharad Pawar : शरद पवारांकडून महाराष्ट्र सरकारचे कौतुक; NDA मध्ये जाण्याच्या चर्चा; चार दिवसांपूर्वीच झाली होती उपमुख्यमंत्री शिंदे-पवार भेट