पुण्यामध्ये कोरोनाचा कहर सुरू आहे. ५० हजारांहून अधिक कोरोनाचे सक्रीय रुग्ण असूनही पुणे महापालिकेने सुरू केलेले कोविड केअर सेंटर मात्र रिकामेच आहे. बहुतांश कोरोनाबाधितांनी घरातच आयसोलेट (विलगीकरण) होणे पसंद केले आहे. Corona’s havoc, Punekars prefer home isolation, Covid care center empty
विशेष प्रतिनिधी
पुणे : पुण्यामध्ये कोरोनाचा कहर सुरू आहे. ५० हजारांहून अधिक कोरोनाचे सक्रीय रुग्ण असूनही पुणे महापालिकेने सुरू केलेले कोविड केअर सेंटर मात्र रिकामेच आहे. बहुतांश कोरोनाबाधितांनी घरातच आयसोलेट (विलगीकरण) होणे पसंद केले आहे.
पुणे महापालिकेचे उपायुक्त राजेंद्र मुठे म्हणाले, महापालिकेने सुरू केलेल्या आयसोलेशन सुविधेला खूपच कमी प्रतिसाद आहे. महापालिकेच्या वतीने शिक्षण संस्था, होस्टेल्स, क्रीडा संकुले आणि महापालिकेच्या मोकळ्या मालमत्तांच्या ठिकाणी आयसोलेशन सेंटर सुरू केली आहेत. याठिकाणी बेड तयारठेवण्यात आले आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन त्यांची संख्याही वाढविण्यात आली आहे.
राज्य सरकार किंवा महापालिकेने जास्तीत जास्त कोरोनाबाधित रुग्णांना आयसोलेशन सेंटरमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला तरी आमची तयारी असल्याचे सांगून मुठे म्हणाले, काही कोरोनाबाधित नियम पाळत नाहीत. बाधित असूनही क्वारंटाईन होण्याऐवजी चार पाच दिवसांतच ते घरी जातात.
कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या वेळी बहुतांश रुग्ण हे झोपडपट्टी परिसरातील होते. त्यांची घरे छोटी आणि सार्वजनिक स्वच्छतागृहे असल्याने त्यांना कोविड केअर सेंटरमध्ये ठेवण्यात येत होते. मात्र, यावेळी बहुतांश रुग्ण हे हौसींग सोसायट्य आणि अपार्टमेंटमध्ये राहणारे आहेत. ते एकतर घरी राहणे पसंत करतात किंवा रुग्णालयात दाखल होता.
Corona’s havoc, Punekars prefer home isolation, Covid care center empty
महत्वाच्या बातम्या
- MAHARASHTRA LOCKDOWN 2021: आता खरी परीक्षा;नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे निर्देश
- रेमडेसिवीर इंजेक्शनचे उत्पादन वाढविण्यावर मोदी सरकारचा भर; दरमहा ८० व्हायरल्स उपलब्ध करणार, किमतीही कमी करणार
- निर्बंधांच्या कठोर अंमलबजावणीची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी सोपविली जिल्हा प्रशासनांवर आणि पोलीसांवर