वृत्तसंस्था
पुणे : पुण्यात गेल्या दोन महिन्यात कोरोनामुळे 129 तरुणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. त्यामुळे कोरोनाची दुसरी लाट तरुणांसाठी घातक ठरली आहे. Corona kills 129 youths in Pune
पुण्यातील 129 मृतांमध्ये 95 युवक आणि 34 युवती आहेत. सर्वाधिक 40 ते 60 या वयोगटातील 241जणांचा मृत्यू झाला आहे. त्यांचेही प्रमाण दोन महिन्यांच्या मृतांच्या आकडेवारीपेक्षा अधिक आहे.
राज्यात आणि शहरात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळत आहेत. मात्र, मार्च आणि एप्रिल महिन्यात कोरोनाने 129 तरुणांचा बळी गेला आहे. हे सर्व 20 ते 40 वयोगटातील आहेत.
दोन महिन्यांत 2 हजार 44 जणांचा कोरोनाचे मृत्यू झाला आहे. फेब्रुवारीपासून दुसरी लाट आली. त्यामध्ये वयाचे निष्कर्ष गळून पडले. यावेळी तरुणांना तर बाधा होत आहेच; परंतु फुफ्फुसे वेगाने निकामी होऊन जीव जाण्याचे प्रकारही वाढत आहेत. दुसऱ्या लाटेत सर्वाधिक मृत्यू 60 वर्षावरील व्यक्तींचे आहेत. दोन महिन्यांत 1 हजार 277 ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू झाला असून, त्यामध्ये 791 पुरुष आणि 486 ज्येष्ठ महिलांचा समावेश आहे.
Corona kills 129 youths in Pune
महत्वाच्या बातम्या
- कर्नाटकात कडक लॉकडाऊनची घोषणा , 10 ते 24 मे पर्यंत लागू ; जीवनावश्यक वस्तूंच्या विक्रीस सकाळी चार तास परवानगी
- पुणे जिल्ह्यातील 27 गावांमध्ये टँकरने पाणी, नळाने पुरवठा केव्हा ? महिलांच्या डोक्यावरील हांडे उतरणार केव्हा ?
- दिल्लीकरांसाठी ‘मिल्क ट्रेन’ धावली ; नागपूरहून 40 हजार लिटर रवाना
- शहामृगासारखे संकट आल्यावर वाळूत तोंड खूपसून बसलात, उच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांना फटकारले
- मुले बाधित झाली तर पालकांनी काय करावे? लहानग्यांच्या लसीकरणावर विचार करा