वृत्तसंस्था
पुणे : कोरोनामुळे झालेल्या मृत्यूने पुण्यात शुक्रवारी सहा हजारांचा टप्पा गाठला. गेल्या वर्षी साथ सुरु झाल्यापासूनची ही एकूण आकडेवारी आहे. शुक्रवारी 65 जण साथीने दगावले आहेत. Corona death toll rises to 6,000 in Pune
शहरात शुक्रवारी 5 हजार 373 जणांना कोरोना झाला तर 5 हजार 49 जण आजारातून मुक्त झाले. सक्रिय रुग्णांची संख्या 54 हजार 424 तर दिवसात 23 हजार 564 जणांची चाचणी केली. 5 हजार 637 जण ऑक्सिजनवर आहेत. 1 हजार 196 गंभीर रुग्ण आहेत.
आतापर्यत 18 लाख 32 हजार 157 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली यासिन 3 लाख 54 हजार 997 जणांना कोरोना झाला. त्यापैकी 2 लाख 94 हजार 171 जण कोरोनामुक्त झाले आहेत.