• Download App
    खलिस्थानी संघटनांचा मुंबईत घातपाताचा कट, केंद्रीय गुप्तचर यंत्रणांची माहिती|Conspiracy of Khalistani organizations in Mumbai, information of Central Intelligence Agency

    खलिस्थानी संघटनांचा मुंबईत घातपाताचा कट, केंद्रीय गुप्तचर यंत्रणांची माहिती

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : नववर्षाच्या पूर्वसंध्येला खलिस्तानी संघटना मुंबईत घातपाताचा मोठा कट आखत असल्याची माहिती केंद्रीय गुप्तचर यंत्रणेच्या हाती लागली आहे. त्यामुळे मुंबईत आता कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.Conspiracy of Khalistani organizations in Mumbai, information of Central Intelligence Agency

    विशेष म्हणजे त्यासाठी मुंबई पोलिसांच्या 31 डिसेंबरला असणाºया साप्ताहिक आणि इतर सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत.मुंबईत गर्दीच्या ठिकाणी घातपाताची घटना घडू शकते, असा इशारा गुप्तचर यंत्रणांकडून देण्यात आला आहे. त्यामुळे मुंबई पोलीस सतर्क झाले आहेत.



    3सगळ्या प्रकारची काळजी घेतली जात आहे. काही अनपेक्षित घटना घडू नये यासाठी ठिकठिकाणी पोलिसांना तैनात करण्यात आलं आहे. सुरक्षा खात्याच्या प्रत्येक विभागाला अलर्टवर ठेवण्यात आलं आहे. यामध्ये प्रत्येक पोलीस ठाणे, पोलीस चौकी पासून ते क्राईम ब्रांच या सगळ्यांचा समावेश आहे.

    मुंबईमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या गेल्या आठ दिवसांपासून वाढत आहे. गेल्या तीन दिवसांपासून तीन हजारांपेक्षा जास्त रुग्ण सापडत आहे. त्यामुळे राज्य सरकारने कडक निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे पोलीसांवर बंदोबस्ताची जबाबदारी आहे. त्यातच दहशतवादी हल्याचा इशारा आल्यामुळे आता अतिरिक्त ताण येणार आहे.

    Conspiracy of Khalistani organizations in Mumbai, information of Central Intelligence Agency

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!