प्रतिनिधी
मुंबई : बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना या हिंदी कहावतीचा प्रत्यय महाराष्ट्रात आला आहे. कर्नाटकात विजय काँग्रेसचा झालाय पण महाराष्ट्रात उत्साह आणि जल्लोष ठाकरे गट आलाय!!Congress victory in karnataka but Thackeray camp is happy with the loose of BJP
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेस विजयी होत असताना शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या नेत्यांनी अतिउत्साही प्रतिक्रिया दिल्या आहेत. कर्नाटकात भाजपचा पराभव नव्हे, तर मोदी – शाहांचा पराभव झाला आहे. मोदींनी बजरंग बलीला निवडणुकीच्या मैदानात आणले. पण त्याची गदा भाजपच्या टाळक्यावर आपटली, अशा शब्दांत शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपला टोचले आहे.
त्याचबरोबर ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी देखील मोदींच्या दिशेने वाग्बाण सोडले आहेत. भाजपच्या स्लीपर सेलने राहुल गांधींना पप्पू म्हटले. पण हाच पप्पू भाजपवाल्यांचा बाप निघाला. ते पप्पूला फेल म्हणत होते. पण पप्पू तो मेरिट मे आ गया!! अशा शब्दांनी सुषमा अंधारे यांनी भाजपने त्यांना घायाळ करण्याचा प्रयत्न केला आहे.
पण हाच बेगानी शादी मे अब्दुल्ला दिवाना या कहावतीचा प्रत्यय आहे. कर्नाटकात शिवसेनेने उमेदवार उभे केले नव्हते. जे उमेदवार होते ते राष्ट्रवादीने उभे केले होते. ते देखील 46 उमेदवार उभे करण्याचे जाहीर करून प्रत्यक्षात 9 उमेदवार उभे केले होते. त्यांचा एकही उमेदवार विजयी झालेला नाही. मात्र तिथे भाजप पराभूत झाला म्हणून इकडे महाराष्ट्रात ठाकरे गटाने “असा” जल्लोष चालविला आहे.
Congress victory in karnataka but Thackeray camp is happy with the loose of BJP
महत्वाच्या बातम्या
- मुख्यमंत्री कोण?? : ना सिद्धरामय्या, ना शिवकुमार; मल्लिकार्जुन खर्गे कर्नाटक विजयाचे शिल्पकार!!; दिल्लीत काँग्रेस मुख्यालयासमोर मोठे पोस्टर!!
- Karnataka Election Result : भाजपाशी बंडखोरी जगदीश शेट्टर यांना भोवली; मोठ्या फरकाने झाले पराभूत!
- IASच्या बदलीवर दिल्ली सरकार आणि नायब राज्यपाल पुन्हा आमनेसामने, प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
- सिद्धरामय्या विरुद्ध शिवकुमार : काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी जोरदार लॉबिंग; डी. के. शिवकुमारांची सर्व आमदारांसाठी खास हवाई व्यवस्था!!