• Download App
    महापालिका निवडणुकीत काँग्रेसचा स्वबळाचा नारा Congress pitching for municipal elections without an alliance

    महापालिका निवडणुकीत काँग्रेसचा स्वबळाचा नारा; पण माजी मुख्यमंत्र्यांच्या नाराजीच्या तीन तऱ्हा

    विशेष प्रतिनिधी 

    एकीकडे मुंबईसह महाराष्ट्रातील सर्व महापालिका, जिल्हा परिषदा निवडणुका स्वबळावर लढविण्याचा नारा काँग्रेसने दिला आहे. पण त्याचवेळी काँग्रेसने महाराष्ट्राला दिलेल्या तीन माजी मुख्यमंत्री यांच्या नाराजीच्या तीन तऱ्हा सगळ्या महाराष्ट्र समोर आल्या आहेत. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण पृथ्वीराज चव्हाण आणि सुशील कुमार शिंदे या तीनही नेत्यांनी आपापल्या नाराजी राजकीय कृतीतून अथवा उघडपणे बोलून दाखवल्या आहेत.Congress pitching for municipal elections without an alliance

     अशोक चव्हाणांची राजकीय कृती

    महाविकास आघाडीचे ठाकरे – पवार सरकार गेल्यानंतर शिंदे – फडणवीस सरकारच्या पहिल्याच विश्वासदर्शक ठरावाच्या वेळेपासून अशोक चव्हाण यांनी आपली काँग्रेस वरची नाराजी आपल्या राजकीय कृतीतून दाखवून दिली आहे. त्यांचा राजकीय कल भाजपकडे आहे. तो अगदी कालच्या मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या नांदेड मधल्या कार्यक्रमात देखील दिसला आहे. माजी मुख्यमंत्री आणि माजी मंत्री म्हणून ते विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शेजारी नांदेड मधल्या शासकीय कार्यक्रमात हजर राहिले होते. एरवी अशा स्वरूपाच्या कार्यक्रमांमध्ये सर्वसाधारणपणे विद्यमान मंत्री राज्यमंत्री वगैरे पुढे असतात. पण कालच्या कार्यक्रमात अशोक चव्हाण देखील तितक्याच ठळकपणे कार्यक्रमात वावरलेले दिसले होते. शिवाय अशोक चव्हाण काँग्रेस मधल्या संघटनात्मक कार्यक्रमांमध्ये देखील आता फारसे दिसत नसल्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा आहेतच. पण अर्थातच काँग्रेस सोडल्याची कोणतीही अधिकृत घोषणा अशोक चव्हाण यांनी केलेली नाही, ही देखील वस्तुस्थिती आहे.

     पृथ्वीराज चव्हाणांची नाराजी

    अशोक चव्हाण यांच्या राजकीय हालचालींची ही तऱ्हा… तर पृथ्वीराज चव्हाण यांची दुसरी तऱ्हा!! पृथ्वीराज चव्हाण हे जी 23 चे गटातले नेते आहेत. गेल्या अडीच – तीन वर्षांपासून काँग्रेस हायकमांड विषयी या जी 23 गटाने जी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे, त्यामध्ये पृथ्वीराज चव्हाण देखील आघाडीवर आहेत. काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक मोकळ्या वातावरणात व्हावी. संघटनेला पूर्णवेळ अध्यक्षा असावा या त्यांच्या मागण्या आजही कायम आहेत आणि त्या त्यांनी पत्रकार परिषदांमध्ये उघडपणे मांडल्या देखील आहेत. ते काँग्रेस सोडणार असल्याच्या बातम्या जरूर काही दिवसांपूर्वी प्रसार माध्यमांमध्ये जरूर आल्या होत्या, पण त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपण काँग्रेस सोडणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्याच वेळी काँग्रेसमध्ये संघटनात्मक सुधारणा हायकमांडने भर दिला पाहिजे यावरही त्यांनी मोकळेपणाने भाष्य केले आहे. ही त्यांच्या ही त्यांच्या काँग्रेसमधल्या नाराजीची उघड खुण आहे.

     सुशीलकुमारांकडून कारस्थानाचा उल्लेख

    … आणि त्यांच्यानंतर सुशील कुमार शिंदे यांनी सिंधी गुजराती समाजाच्या जाहीर कार्यक्रमामध्ये काँग्रेसमधल्या कारस्थानाचा जाहीर उल्लेख केला आहे. आपल्याला कारस्थान करून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावरून हटविण्यात आले होते, याची आठवण त्यांनी या कार्यक्रमामध्ये करून दिली आहे. गुजराती समाजाला आपण 2 % आरक्षण देऊ शकलो याचे समाधान आहे. त्या समाजामुळेच आपण विजयी होऊ शकलो पण या विजयानंतर देखील आपल्याला काँग्रेसमध्ये कारस्थान करून मुख्यमंत्री पदावरून दूर करून आंध्र प्रदेशच्या राज्यपाल पदावर पाठविले होते, याची आठवण सांगून सुशील कुमार शिंदे यांनी आपल्या मनातली खदखद बोलून दाखवली आहे. अर्थात त्यांनी देखील वर उल्लेख केलेल्या दोन्ही माजी मुख्यमंत्र्यांसारखीच आपण काँग्रेस सोडत असल्याची कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही किंबहुना काँग्रेसच्या नेतृत्वामध्ये सुधारणा व्हावी ही या माजी मुख्यमंत्र्यांची सुप्त इच्छा आहे, ही देखील वस्तुस्थिती मान्य करावी लागेल.

    स्वबळाचा नारा, संघटनेत नाराजी!!

    पण एक मुद्दा त्यापलिकडचा देखील आहे, तो म्हणजे काँग्रेस येणारी महापालिका निवडणूक स्वबळावर लढवण्याची तयारी करत असताना आणि तसे नारे दिले जात असताना तीन माजी मुख्यमंत्री वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये अथवा पत्रकार परिषदांमध्ये आपली जाहीर नाराजी बोलून दाखवतात आणि त्यातही ती काँग्रेस संघटनात्मक पातळीवरची नाराजी असते, याला विशेष महत्त्व आहे.

    स्वबळ निर्मितीला खोडा?

    काँग्रेस जेव्हा स्वबळाचा नारा देते, तेव्हा स्वाभाविकपणे सर्व नेते गट तट विसरून एकजुटीने निवडणुकीच्या मैदानात उतरतील अशी अपेक्षा आहे. पण तीन माजी मुख्यमंत्री नाराजीचे वेगवेगळे सूर व्यक्त करतात… यातून त्या मुख्यमंत्र्यांना जरी काही म्हणायचे असले तरी काँग्रेस पक्ष संघटनेसाठी स्वबळ निर्मितीच्या प्रयत्नांमध्ये याचा खोडा बसतो त्याचे काय?? त्याचा विचार काँग्रेसमध्ये कोण करणार??, हे प्रश्न तयार होतात आणि ऐन निवडणुकीच्या काळात तर ते अधिक परिणामकारक असतात, हे या तिन्ही मुरब्बी नेत्यांना माहिती नसेल काय?? या प्रश्नाचे उत्तर नेमके कोण देणार??

    Congress pitching for municipal elections without an alliance

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Thackeray -Pawar : ऐक्य + बैठकांच्या कोरड्या बातम्या; प्रत्यक्षात भाजप प्रणित सरकारला धक्का लावता येत नसल्याच्या निराशा!!

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!