• Download App
    Congress or BJP will have control over Sharad Pawar's rajaysabha ambitions शरद पवार महाविकास आघाडीचे उमेदवार असतील, तर नाड्या काँग्रेस हायकमांडच्या हातात!!; राष्ट्रवादीचे उमेदवार असतील, तर नाड्या भाजपच्या हातात!!

    शरद पवार महाविकास आघाडीचे उमेदवार असतील, तर नाड्या काँग्रेस हायकमांडच्या हातात!!; राष्ट्रवादीचे उमेदवार असतील, तर नाड्या भाजपच्या हातात!!

    Sharad Pawar'

    नाशिक : राज्यसभा निवडणुकीसाठी शरद पवार महाविकास आघाडीचे उमेदवार असतील तर नाड्या काँग्रेस हायकमांडच्या हातात आणि ते जर सुनेच्या पाठिंब्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असतील, तर नाड्या भाजपच्या हातात!!, हीच शरद पवारांच्या राजकीय कारकीर्दीच्या अखेरच्या निवडणुकीतली खरी गोष्ट असेल.Congress or BJP will have control over Sharad Pawar’s rajaysabha ambitions

    संजय राऊत यांनी शरद पवारांचे नाव राज्यसभेच्या उमेदवारीसाठी पुढे सरकवल्यानंतर खऱ्या अर्थाने या निवडणुकीत रंगत आली. संजय राऊतांनी त्यांचे नाव पुढे सरकवल्यामुळे काँग्रेसने त्यांना आतून विरोध दर्शविला. शरद पवार भाजपला डोळा मारणार असतील आणि भाजपच्या अजेंड्याला छुपाच पाठिंबा देणार असतील, तर आपल्या मतांच्या बळावर त्यांना राज्यसभेत का पाठवा??, असा सवाल काँग्रेस मधल्या एका गोटाने करून शरद पवारांच्या उमेदवारीचा चेंडू काँग्रेस हायकमांडच्या कोर्टात ढकलला. राज्यसभा निवडणूक आणि महाराष्ट्रातले राजकीय परिस्थिती या विषयावर चर्चा करायला हर्षवर्धन सपकाळ दिल्लीतल्या हायकमांडपाशी पोहोचले. काँग्रेसच्या हायकमांडने राज्यसभा निवडणुकीबाबत अजून आपले पत्ते गुलदस्त्यातच ठेवले ते खोलले नाहीत. काँग्रेस हायकमांडची एकूण कार्यशैली लक्षात घेता ते पत्ते इतक्यात खोलणारही नाहीत. त्यामुळे शरद पवारांची महाविकास आघाडीकडूनची उमेदवारी लटकतीच राहील. पण नाड्या मात्र काँग्रेस हायकमांडच्या हातात असतील.



    – सुनेत्रा पवार परस्पर निर्णय घेणे अशक्य

    याच दरम्यान शरद पवारांनी काही खेळी करून म्हणजेच आपल्या सुने पुढे शरणागती पत्करून राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी मिळवलीच, तर त्यांच्या सुनेला म्हणजेच सुनेत्रा पवारांना त्यासाठी भाजपची परवानगी घ्यावी लागेल. कारण राज्यसभा निवडणुकीच्या विषयावर भाजपशी चर्चा न करता सुनेत्रा पवार परस्पर काही निर्णय घेतील, अशी सध्या तरी शक्यता दिसत नाही. आपल्या सासऱ्याच्या भरवशावर राहून सुनेत्रा पवारांनी तसा कुठला परस्पर निर्णय घ्यायचा प्रयत्न केला, तर भाजप ते ऐकून घेण्याची सुद्धा शक्यता नाही. मग सुनेत्रा पवारांच्या बाजूने सध्या कितीही राजकीय सहानुभूती असली तरी भाजपचे नेते वेगळ्या वेगळ्या मार्गांनी सुनेत्रा पवारांच्या वेगळ्या वेगळ्या निर्णयांना हाणून पाडल्याशिवाय राहणार नाहीत.

    – सुनेत्रा पवारांची सावधगिरी

    पण सुनेत्रा पवार यांची गेल्या पंधरा दिवसांमधली छोटीच का होईना, पण राजकीय कारकीर्द पाहिली तर त्या अतिशय सावधगिरीने काम करतात त्या राजकारणाकडे किंवा माध्यमांमधून चालणाऱ्या विलीनीकरणाच्या बातम्यांकडे फारसे लक्ष देत नाहीत. आपण बरे आणि आपले काम बरे, हेच त्यांचे सध्याचे धोरण दिसते. त्यामुळे शरद पवारांची उमेदवारी जर राष्ट्रवादी काँग्रेस कडूनच निश्चित होणार असेल, तर ती सुनेच्या पुढे शरणागती पत्करून होईल आणि भाजपची त्याला परवानगी असेल, अन्यथा शरद पवारांना महायुतीकडून तरी राज्यसभेचे तोंड दिसण्याची शक्यता नाही.

    – नाड्या काँग्रेस किंवा भाजपच्या जातात

    शरद पवारांच्या राजकीय कारकीर्दीच्या अखेरीस ही अवस्था येऊन ठेपली. कारण त्यांची राजकीय महत्त्वाकांक्षा कितीही मोठी असली, तरी त्यांचे कर्तृत्व आकड्यांमध्ये परावर्तित होऊ शकले नाही. पवारांनी स्वकर्तृत्वावर निवडून आणलेल्या 10 आमदारांच्या बळावर ते राज्यसभेत पोहोचू शकत नाहीत. उद्धव ठाकरे यांची पुढची विधान परिषदेची निवडणूक लक्षात घेऊन कदाचित शिवसेनेचे 20 आमदार त्यांच्या पाठीशी उभे राहतील. पण त्यांना काँग्रेसच्या 16 आमदारांची गरज लागेलच पण या 16 आमदारांच्या मतांसाठी शरद पवारांना काँग्रेसच्या हायकमांडशी बोलावे लागेल. नुसते भाजपला डोळे मारून चालणार नाही. म्हणजेच निवडून येण्यापुरते का होईना, पण शरद पवारांच्या नाड्या काँग्रेसच्या हातात असतील. अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या मतांच्या बळावर निवडून यायचे असेल, तर शरद पवारांना सुने पुढे तात्पुरती का होईना, पण शरणागती पत्करावी लागेल. पण त्याचवेळी त्यांच्या नाड्या भाजपच्या नेत्यांच्या हातात असतील.

    – पवारांनी पक्ष फोडला तर…

    पण याच दरम्यान शरद पवारांनी काही खेळी करून सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या आमदारांना फोडून स्वतःकडे मते वळवली, तर मात्र शरद पवार कदाचित राज्यसभेवर निवडून सुद्धा जाऊ शकतील, माध्यमिक पवारांच्या मुत्सद्देगिरीचे ढोल पिटतील, पण या निवडणुकीची फार मोठी राजकीय किंमत सुनेत्रा पवार, शरद पवार आणि सुप्रिया सुळे तसेच रोहित पवारांना चुकवावी लागेल. दीर्घकालीन राजकारण राजकारणाच्या खेळीत भाजपचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस नावाचा पक्ष अक्षरशः मोडून खातील. ती किंमत चुकविण्यावाचून त्यांना पर्याय उरणार नाही. कारण भाजप सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीला आपल्याबरोबर आधीच्या सन्मानाने वाटचाल करू देणार नाही. कुठल्याच राष्ट्रवादीला भाजपच्या सत्तेतला वाटा मिळविणे शक्य राहणार नाही‌ आणि सत्तेशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस कुठल्याच पवारांच्या बळावर टिकू शकणार नाही.

    Congress or BJP will have control over Sharad Pawar’s rajaysabha ambitions

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    मोदी – शाहांना चुचकारा, भाजपच्या मित्रपक्षांना डिवचा; विलीनीकरण फसल्याच्या डावाचे वड्याचे तेल वांग्यावर काढा!!

    AI फॉर एग्रीकल्चर वर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा AI इंडिया समिटमध्ये विशेष संवाद!!; महाराष्ट्राचे मॉडेल स्वीकारले संपूर्ण देशाने!!

    राज्यसभा निवडणुकीत महायुतीचे सहा उमेदवार निवडून येणे पक्के; उरलेला एक उमेदवार महाविकास आघाडीने ठरवावा!; फडणवीसांनी मारली पाचर