विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : देशातल्या सगळ्यात जुन्या राष्ट्रीय पक्षाचे अर्थात काँग्रेसचे नवे मुख्यालय इंदिरा भवन तयार झाले असून 15 जानेवारीला काँग्रेस पक्ष 24 अकबर रोड मधून कोटला रोड वरल्या इंदिराभवानात शिफ्ट होणार आहे. काँग्रेसला तब्बल 47 वर्षानंतर नवे मुख्यालय मिळणार आहे.
2 जानेवारी 1978 रोजी इंदिरा गांधींनी स्वतंत्र राजकीय वाटचाल करण्यासाठी इंदिरा काँग्रेसची स्थापना करून 24 अकबर रोड हे मुख्यालय निवडले होते. तेव्हापासून 14 जानेवारीपर्यंत याच मुख्यालयातून काँग्रेसचा कारभार चालला. सोनिया गांधींच्या अध्यक्षपदाच्या काळात काँग्रेसच्या नव्या मुख्यालयासाठी विचार सुरू झाला आणि कोटला रोडवर बांधकाम सुरू झाले. ते आता पूर्ण झाले असून 15 जानेवारी रोजी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे काँग्रेसच्या बड्या नेत्यांच्या उपस्थितीत काँग्रेसचे नवे मुख्यालय इंदिरा भवनाचे उद्घाटन करतील.
Pankaja Munde “ते” बीडचे पर्यावरण सुधारतील; पंकजा मुंडेंचा मुख्यमंत्र्यांवर पूर्ण विश्वास!!
इंदिरा गांधींनी दोनदा काँग्रेसमध्ये फूट पाडली. पहिली फूट 1969 मध्ये पाडली. दुसरी फूट 1978 मध्ये पाडली. पण प्रत्येक वेळी त्यांनी आपलीच काँग्रेस ही काँग्रेसचा मुख्य प्रवाह असल्याचे स्वतःच्या राजकीय कर्तृत्वाने सिद्ध केले. बाकीच्या कुठल्याही नेत्यांच्या काँग्रेसला काँग्रेसचा मुख्य प्रवाह असल्याचे सिद्ध करता आले नाही. यामध्ये एस. निजलिंगप्पा, मोरारजी देसाई, ब्रह्मानंद रेड्डी, यशवंतराव चव्हाण, जगजीवन राम, देवराज अर्स, शरद पवार, ममता बॅनर्जी, वाय. एस. जगनमोहन रेड्डी आदी नेत्यांचा समावेश राहिला. या प्रत्येकाने आपापली स्वतंत्र काँग्रेस काढली. पण राजकीय कर्तृत्वाच्या अभावी त्यांना आपलीच काँग्रेस मुख्य प्रवाहातली काँग्रेस असल्याचे सिद्ध करता आले नाही.
त्यामुळे आजच्या काँग्रेसला जे स्वरूप आले, ते इंदिरा गांधींनी दिले म्हणूनच त्यांचेच नाव काँग्रेसच्या नव्या मुख्यालयाला दिले गेले आहे.
Congress new headquarters Indira Bhavan ready
महत्वाच्या बातम्या
- HMPVच्या वाढत्या प्रकरणानंतर केंद्र सरकार सतर्क; आरोग्य सचिवांनी घेतली बैठक
- 500 ₹ च्या फरकाने महाराष्ट्रात काँग्रेसला तारले नाही; दिल्लीत 400 ₹ चा फरक पक्षाला तारले??
- Mahakumbh : महाकुंभ 2025ची तयारी सुरू, NDRFच्या टीमने केले मॉक ड्रील; 9 जणांचे प्राण वाचवले
- HMPV व्हायरसच्या प्रकरणांबाबत महाराष्ट्र सरकार सतर्क