विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढण्याची तयारी कॉँग्रेसने केली पण आपल्याच नेत्यांवर भरोसा नाही. त्यामुळे महापौरपदासाठी कॉँग्रेसला कोणीतरी सेलीब्रेटी चेहरा हवा आहे. रितेश देशमुख, मिलींद सोमण किंवा सोनू सूद यांना महापौरपदासाठी उमेदवार म्हणून जाहीर करावे असे एका अहवालात म्हटले आहे.Congress needs Ritesh Deshmukh, Sonu Sood for mayor post
काँग्रेसच्या स्ट्रॅटजी कमिटी सचिवांकडून एक अहवाल सादर करण्यात आला आहे. मुंबई काँग्रेस स्ट्रॅटेजी कमिटी सचिव गणेश कुमार यादव यांनी हा अहवाल सादर केला आहे. या अहवालात मुंबईच्या महापौरपदासाठी काही नावांचा विचार करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यात अभिनेता रितेश देशमुख, अभिनेता सोनू सूद, मॉडेल आणि अभिनेता मिलिंद सोमण यांसारख्या सेलिब्रिटींचा समावेश आहे.
या स्ट्रॅटेजी कमिटीत एच. के. पाटील, अशोक चव्हाण, नाना पटोले, भाई जगताप, अस्लम शेख, वर्षा गायकवाड, चंद्रकांत हंडोरे, विरोधी पक्ष नेते रवी राजा हे नेते आहेत. त्यामुळे आता या कमिटीचा हा अहवाल चर्चेत विषय ठरत आहे. विशेष म्हणजे येत्या काही दिवसात या नेत्यांच्या कमिटीसमोर हा रिपोर्ट विचारार्थ ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर यावर निर्णय घेतला जाणार आहे.
या स्ट्रॅटेजी कमिटीच्या अहवालात महापौरपदासाठी सेलिब्रेटीच्या नावाचा उल्लेख करण्यात आल्याने आता काँग्रेसची मदार अभिनेत्यांवर आहे का, अशा चर्चांना उधाण आले आहे. मात्र यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत गेल्या वेळी कॉँग्रेसला केवळ २९ जागा मिळाल्या होत्या. शिवसेनेने ९४ तर भारतीय जनता पक्षाने ८३ जागा मिळविल्या होत्या. मुंबई महापालिकेत भाजप शिवसेनेसोबत सत्तेत थेट सहभागी नाही.
मात्र, भाजपला 2014 मध्ये राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी पाठिंबा दिल्याने भाजपने बीएमसीत महापौर पदावर दावा केला नव्हता. शिवसेनेला मुंबईच्या महापौरपदावर दावा करण्यासाठी बहुमताचा जादुई आकडा 113 होता. त्यासाठी भाजपनं शिवसेनेला मदत केली होती.
Congress needs Ritesh Deshmukh, Sonu Sood for mayor post
महत्त्वाच्या बातम्या
- मारुती सुझुकी उद्योग समुहाला ठोठावला २०० कोटी रुपयांचा दंड, भारतीय स्पर्धा आयोगाने केली कारवाई
- Coronavirus : अफगाणिस्तानातून दिल्लीला परतलेल्या 146 प्रवाशांमध्ये दोन जणांना कोरोनाची लागण
- महाराष्ट्रात दहीहंडीला बंदी घातली जात असताना पुरीतील जगन्नाथ मंदिर भाविकांसाठी खुले
- घसरलेली जीभ आणि उगारलेले हात…!!