• Download App
    काँग्रेस, राष्ट्रवादी देखील राजकीय अस्पृश्यता पाळतात; प्रकाश आंबेडकरांचा आरोप|Congress, NCP also follow political untouchability; Allegation of Prakash Ambedkar

    काँग्रेस, राष्ट्रवादी देखील राजकीय अस्पृश्यता पाळतात; प्रकाश आंबेडकरांचा आरोप

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : आम्हाला फक्त समाजातच अस्पृश्य म्हणून वागवले जात नाही, तर राजकारणातही अस्पृश्य म्हणूनच वागवले जाते, असा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. प्रकाश आंबेडकरांनी वेगवेगळ्या ट्विटमधून भाजप आणि काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला.Congress, NCP also follow political untouchability; Allegation of Prakash Ambedkar

    भाजप – आरएसएसच्या राजकारणाचा प्रभाव वाढल्यापासून सनातन धर्म मानणारे आणि त्याचे प्रचारक असणारे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोघेही राजकारणात अस्पृश्यता पाळायला लागले आहेत, असा आरोप त्यांनी यावेळी केला आहे.



    निमंत्रणे का वाटत फिरत होतात?

    प्रकाश आंबेडकर यांना “इंडिया” आघाडीच्या बैठकीचे निमंत्रण का देण्यात आले नाही?, असा सवाल विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना केला होता, यावर बोलताना आंबेडकरांना बैठकीचे निमंत्रण द्यायला ही काय सत्यनारायणाची पूजा आहे काय? असा सवाल करून आंबेडकरांना डिवचले. यावर बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, “इंडिया” आघाडीमध्ये येण्यासाठी आम्हाला निमंत्रणाची गरज नव्हती, तर इतर पक्षांना निमंत्रणे का वाटत फिरत होतात?? असा थेट सवाल काँग्रेसला केला.

    काँग्रेसच्या हेतूंवरच उभे केले प्रश्नचिन्ह

    “इंडिया” आघाडीत येण्यासाठी निमंत्रणाची गरज नव्हती, तर इतर पक्षांना निमंत्रणे का वाटत फिरत होतात? लालू प्रसाद यादव आणि स्टॅलिन या शूद्रांमधल्या मोठ्या समाजवादी नेत्यांशिवाय तुमच्या आघाडीची गाडी अडली नसती, तर त्यांना तुम्ही निमंत्रण दिले असते का??, याबद्दल मला शंकाच आहे, असे म्हणत प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसच्या हेतूंवरच प्रश्न उपस्थित केला आहे.

    Congress, NCP also follow political untouchability; Allegation of Prakash Ambedkar

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Maratha reservation : मराठा आरक्षणासाठी मुंबईत तणाव, फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल!

    Mumbai Kohima : भारतात मुंबई आणि कोहिमा महिलांसाठी सर्वात सुरक्षित शहरे; पाटणा आणि दिल्ली सर्वात कमी सुरक्षित

    Devendra Fadnavis मराठा आंदोलनावर राजकीय पोळी भाजणाऱ्यांचे तोंड भाजेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा इशारा!!