प्रतिनिधी
मुंबई : संधी असूनही काँग्रेसचा विरोधी पक्षनेता अद्याप ठरेना. पण अजितदादांच्या मुख्यमंत्रीपदाचा दावा मात्र करायला काँग्रेसचे आमदार अजूनही पुढे येत आहेत. Congress MLA’s claim for Ajit Dad’s post as Chief Minister
अजित पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील, असे वक्तव्य पृथ्वीराज चव्हाण यांनी केल्यानंतर स्वतः अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी त्या वक्तव्याचा नुसता इन्कार केला असे नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना या दोन्ही नेत्यांनी दम भरला. महाराष्ट्रात अजिबात संभ्रम पसरवू नये. एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री असतील अशा स्पष्ट शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी अजितनिष्ठ आमदारांना सुनावले.
त्याआधी अजित पवारांनी मंत्री अजित पाटील, धर्मराव बाबा आत्राम आणि आमदार अमोल मिटकरी यांना त्याच मुद्द्यावरून झापले. तरी देखील काँग्रेस आमदारांचा अजितदादाच मुख्यमंत्री होणार असल्याचा दावा थांबायला तयार नाही. काँग्रेसचे आमदार अभिजीत वंजारी यांनी अजितदादा मुख्यमंत्री होणार असल्याचा दावा पुन्हा एकदा केला.
स्वतः अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी कितीही इन्कार केला असला तरी अजित पवार एक दिवस मुख्यमंत्री होणार आणि नंतर अजित पवार हे सरकारचे नेतृत्व करत असल्याचे आपल्याला सांगितले जाणार, असा दावा अभिजीत वंजारी यांनी केला. सगळ्या स्ट्रॅटेजी उघड होत नसतात राजकारणात रोज काय घडते ते बाहेर कोणी सांगत नाही. ते अचानक समोर आल्यावर लोकांना आश्चर्य वाटते पण त्यामागे अनेक दिवसांची अनेक दिवसांच्या बैठक आणि विचारविनिमय दडलेला असतो. अजित पवारांच्या बाबतीत तसेच होणार आहे, असा दावाही अभिजीत वंजारी यांनी केला.
राष्ट्रवादीत उभी फूट पडल्यानंतर एकीकडे काँग्रेसला अजून विरोधी पक्षनेता ठरवता येत नाही. कोणाही एका नेत्याच्या गळ्यात विरोधी पक्षनेते पदाची माळ घातली तर बाकीचे नेते फुटून बाहेर पडून भाजपला पाठिंबा देतील, अशी भीती काँग्रेस श्रेष्ठींना वाटत आहे . त्यामुळे ते काँग्रेसच्या विरोधी पक्ष नेत्याचे नाव जाहीर करत नाहीत. पण ज्या काँग्रेसला विरोधी पक्षनेता करता येत नाही, त्या काँग्रेसचे आमदार मात्र अजितदादांच्या मुख्यमंत्री पदावर बेट लावून असल्याचे दिसून येत आहे.
Congress MLA’s claim for Ajit Dad’s post as Chief Minister
महत्वाच्या बातम्या
- आप नेते सत्येंद्र जैन यांना अंतरिम जामीन मंजूर, मनी लाँड्रिंगचे गंभीर आरोप
- गडकरी म्हणाले- मतदार हा हुशार आहे, लोभी नाही; घरोघरी मटण वाटले, तरीही आम्ही निवडणूक हरलो
- मणिपूरवर चर्चा न झाल्याने जया बच्चन संतापल्या, नेत्यांनी चर्चा न करणे लाजिरवाणे असल्याची टीका
- पोस्टरवरच्या मुख्यमंत्र्यांच्या पंखांना छाट; हा तर खरा थोरल्यांनाच भाजप श्रेष्ठींनी लावलेला चाप!! घेतला भाजप कार्यकर्त्यांचा क्लास!!