• Download App
    Congress महायुतीच्या लाडक्या बहिणीविरोधात कोर्टात धाव; पण आता काँग्रेसच खेळणार "महालक्ष्मी" योजनेवर डाव!!

    Congress : महायुतीच्या लाडक्या बहिणीविरोधात कोर्टात धाव; पण आता काँग्रेसच खेळणार “महालक्ष्मी” योजनेवर डाव!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : महाराष्ट्रातील महायुती सरकारने जाहीर करून लागू केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेविरुद्ध काँग्रेसच्याच कार्यकर्त्यांनी न्यायालयात धाव घेतली, पण आता विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच महालक्ष्मी नावाच्या योजनेवर डाव खेळणार असल्याची बातमी समोर आली. Congress

    महायुती सरकारने लोकसभेतील पराभवाचा धडा घेतल्यानंतर महायुती सरकारने महाराष्ट्रात लाडके बहिणी योजना लागू केली. सुमारे अडीच कोटी महिलांच्या खात्यांमध्ये दरमहा 1500 रुपये जमा होऊ लागले. त्याचे राजकीय परिणाम महाराष्ट्रात दिसायला लागल्याबरोबर काँग्रेसच्या नेत्यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या विरोधात न्यायालयात धाव घेतली.

    काँग्रेसचे कार्यकर्ते अनिल वडपल्लीवार यांनी न्यायालयात अर्ज दाखल केला. महाराष्ट्राची आर्थिक हालत खस्ता असताना लाडके बहीण योजनेतून राज्याच्या तिजोरीवर आर्थिक बोजा पडत आहे. त्यामुळे संबंधित योजना बंद करायचे आदेश द्यावेत, अशी मागणी अनिल वडपल्लीवार यांनी न्यायालयात केली. त्या संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीरपणे काँग्रेसचे वाभाडे काढल्यानंतर अनिल वडपल्लीवार आपण काँग्रेसचे कार्यकर्ते असलो, तरी न्यायालयातल्या आपल्या अर्जाशी यांनी त्यामध्ये पक्षाचा काही संबंध नसल्याचा दावा केला, पण म्हणून काँग्रेसने रचलेला डाव झाकून राहिला नाही.

    त्या उलट आता काँग्रेसच महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात महालक्ष्मी योजनेचा समावेश करून त्यावर डाव खेळण्याची बातमी समोर आली. काँग्रेसने हरियाणा विधानसभा निवडणुकीत महालक्ष्मी योजनेतून महिलांच्या खात्यात 2000 रुपये देण्याची आधीच घोषणा केली होती. त्याचा उल्लेख जाहीरनाम्यात केला होता. आता तोच उल्लेख महाराष्ट्राच्या जाहीरनाम्यात रिपीट करण्याचा काँग्रेसचा इरादा असल्याचे बोलले जात आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत महाराष्ट्राच्या नेत्यांच्या झालेल्या बैठकीत महालक्ष्मी योजनेवर शिक्कामोर्तब केल्याची बातमी माध्यमांनी दिली. Congress

    Congress may declare mahalaxmi yojna in maharashtra

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Sunil Tatkare : श्रीकांत शिंदे केंद्रीय शिक्षणमंत्री होणार? खासदार सुनील तटकरेंनी दिले स्पष्टीकरण

    Chhagan Bhujbal : धर्मेंद्र प्रधानांनी आधीच राजीनामा द्यायला हवा होता; पोलिस लाठीचार्ज अन् देशातील संताप टळला, छगन भुजबळांचा सरकारला घरचा आहेर

    Gunratna Sadavarte : ठाकरे हे आपल्या दोन्ही लेकरांच्या प्रमोशनसाठी आले; गुणरत्न सदावर्तेंची तिरंगा रॅलीवर टीका, म्हणाले- घोषणा देण्यास रोजाने माणसं लावली