विशेष प्रतिनिधी
मुंबई : अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याचे निमंत्रण उद्धव ठाकरेंना दिले नाही म्हणून आधी थयथयाट करणाऱ्या शिवसेनेने काँग्रेसच्या नेत्यांनी मात्र अयोध्येला जावे म्हणून सामनातून त्यांचा “क्लास” घेतला आहे!! अयोध्यातल्या रामाबरोबर शिवसेनेचे नाते जेवढे दृढ आहे, तेवढेच काँग्रेसही नाते दृढ आहे, असा उपदेश शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून केला आहे.Congress leaders should go to ayodhya for ram mandir inauguration, preach shvisena in saamna
आता हा “उपदेश” आहे की काँग्रेसच्या विद्यमान नेतृत्वाला हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेनेने डिवचले आहे, हा भाग अलहिदा, पण काँग्रेसच्या नेत्यांनी अयोध्येला जावे यासाठी शिवसेनेने कॅनव्हासिंग केले आहे, हे मात्र निश्चित!!
हिंदुत्वावर आपलीच मक्तेदारी आहे, असे समजून भाजपने 22 जानेवारीला सर्वांना दिवाळी करण्याचे फर्मान सोडले आहे, तरी प्रत्यक्षात रामराज्य ही संकल्पना महात्मा गांधींनी मांडली. त्यांच्या मुखी नेहमी रामनाम असायचे. सोमनाथच्या मंदिराचा जीर्णोद्धार काँग्रेसच्याच राजवटीत झाला. 1989 मध्ये राजीव गांधींनी श्रीराम मंदिराच्या शिलाज्ञासाला परवानगी दिली होती. अयोध्यातील राम जन्मभूमी स्थानावर भव्य राम मंदिर व्हावे ही राजीव गांधींची इच्छा होती. पी. व्ही. नरसिंह राव यांच्या सरकारने अध्यादेश काढून अयोध्येतील वादग्रस्त 2.77 जागा ताब्यात घेतली होती. त्या भोवतीची 60 एकर जागा देखील अशीच सरकारने ताब्यात घेतली होती. तेथे राम मंदिर, मशिद आणि म्युझियम बांधण्याची नरसिंह राव यांची संकल्पना होती. परंतु नरसिंह राव यांच्या संकल्पनेला भाजपने त्यावेळी विरोध केला होता, असा दावा सामनाच्या अग्रलेखात केला आहे.
काँग्रेसच्या 3 वेगवेगळ्या पंतप्रधानांच्या काळात घडलेल्या घटनांचा आढावा घेऊन सामनाने काँग्रेसच्या विद्यमान नेतृत्वाला अयोध्येच्या राम मंदिर लोकार्पण सोहळ्याला जाण्याचा उपदेश केला आहे.
अर्थात हा “उपदेश” आहे की काँग्रेसच्या विद्यमाने नेतृत्वाला त्यांनी डिवचले आहे??, हा भाग वेगळा. कारण काँग्रेसचे विद्यमान नेतृत्व भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांच्या करीत बाकी कोणाचाच वारसा मानायला तयार नाही. नरसिंह राव यांचा सगळाच वारसा, तर काँग्रेसने केव्हाच गुंडाळून ठेवला आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्यांनी अयोध्येचा राम मंदिर सोहळ्याला जावे हा सामनाकरांचा “उपदेश” त्या नेत्यांच्या कितपत पचनी पडतो??, हा खरा सवाल आहे!!
Congress leaders should go to ayodhya for ram mandir inauguration, preach shvisena in saamna
महत्वाच्या बातम्या
- द फोकस एक्सप्लेनर : हिट अँड रनचा वाद काय? भारतातल्या कायद्याला विरोध का? परदेशात कोणते कायदे? वाचा सविस्तर
- ‘अबकी बार 400 पार, तीसरी बार मोदी सरकार’, लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचा नवा नारा!
- ‘हिट अँड रन’ कायद्याची सध्या अंमलबजावणी होणार नाही, संप मागे घेण्याचे आवाहन!
- मराठा आरक्षणासंदर्भातील सर्व्हेक्षणाचे काम बिनचूक आणि कालबद्धरितीने व्हावे