नाशिक : गजनीच्या मोहम्मदाने पहिले ज्योतिर्लिंग सोमनाथ वर हल्ला करून ते उद्ध्वस्त केले. या आक्रमणाला 1000 वर्षे पूर्ण झाल्यानंतरच त्या 1000 वर्षांमध्ये प्रचंड संघर्ष झाले. सोमनाथाचे मंदिर पुन्हा दिमाखाने उभे राहिले. याविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खास लेख लिहिला. भारतावर झालेल्या आक्रमणाची आणि भारतीयांनी संघर्ष करून मिळविलेल्या विजयाची आज आठवण करून दिली.Congress leaders renovated the Somnath Temple, but…
मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आजच्या लेखावर काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रवक्ते अनंतराव गाडगीळ यांनी टीका केली. सोमनाथच्या मंदिराचा जीर्णोद्धार काँग्रेसच्या नेत्यांनी केला, याची सविस्तर आठवण अनंतराव गाडगीळ यांनी मोदींना आणि भारतीय जनतेला करून दिली. काँग्रेसची एक बैठक झाली. त्या बैठकीला सरदार वल्लभभाई पटेल, काकासाहेब गाडगीळ कन्हैयालाल मुन्शी वगैरे नेते हजर होते. आपल्या मंदिराचा विध्वंस झाला आहे. तो आपण दुरुस्त केला पाहिजे, असे सरदार पटेल त्या बैठकीत म्हणाले. सरदार वल्लभभाई पटेल यांनी काकासाहेब आणि कन्हैयालाल मुन्शी यांच्यावर जबाबदारी टाकली. या दोघांनी गुजरातमध्ये मुक्काम करून सोमनाथच्या मंदिराचा जीर्णोद्धार घडवून आणला, असे अनंतराव गाडगीळ यांनी सांगितले.
– सत्य सांगितले, पण अर्धेच
अनंतराव गाडगीळ यांनी सांगितले, ते खरेच होते. कारण सोमनाथच्या मंदिराचा जीर्णोद्धार सरदार वल्लभभाई पटेल यांनी घडवून आणला हे सत्य नरेंद्र मोदींनी नाकारलेच नाही पण अनंतराव गाडगीळ यांनी मात्र सांगितलेले सत्य अर्धसत्य होते. कारण सोमनाथ मंदिराच्या जीर्णोद्धारात सरदार वल्लभभाई पटेल, काकासाहेब गाडगीळ आणि कन्हैयालाल मुन्शी यांचे योगदान होते हे खरेच, पण त्यांचे योगदान त्यावेळच्या नेहरूंच्या वर्चस्वाखालच्या काँग्रेस नेत्यांनी आणि नंतरच्या काँग्रेस नेत्यांनी मान्यच केले नाही.
– नेहरूंचा होता विरोध
किंबहुना सोमनाथ मंदिराचा जीर्णोद्धार सरकारी खर्चाने करायला पंडित नेहरूंनी विरोध केला होता. इतकेच नाही, तर ज्यावेळी तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी सोमनाथच्या मंदिराच्या जीर्णोद्धाराचे आणि प्रतिष्ठापनेचे यजमानत्व स्वीकारले, त्यावेळी सुद्धा नेहरूंनी राजेंद्र प्रसाद यांना विरोध केला होता. भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे. त्यामुळे राजेंद्र प्रसाद यांनी भारताचे राष्ट्रपती म्हणून सोमनाथ मंदिराचा जीर्णोद्धार आणि सोमनाथाची प्रतिष्ठापना यात सहभाग घेऊ नये. त्यांनी वैयक्तिक पातळीवर तिथे जाऊन दर्शन घ्यावे, असे आग्रही मत पंडित नेहरूंनी त्यावेळी नोंदविले होते. परंतु राजेंद्र प्रसाद आणि सरदार वल्लभभाई पटेल यांनी नेहरूंचे मत जुमानले नव्हते. राजेंद्र प्रसाद सोमनाथाच्या प्रतिष्ठापना सोहळ्याला तिथे हजर राहिले. त्यांनी वैदिक धर्मशास्त्रानुसार सोमनाथाची प्रतिष्ठापना केली.
मात्र हा पूर्ण इतिहास अनंतराव गाडगीळ यांनी सांगितला नाही. त्यांनी फक्त काँग्रेसच्या नेत्यांनी सोमनाथ मंदिराचा जीर्णोद्धार केला, एवढेच संदिग्ध सत्य किंवा अर्धसत्य सांगितले. गैरसोयीचे सत्य त्यांनी सांगितलेच नाही.
Congress leaders renovated the Somnath Temple, but…
महत्वाच्या बातम्या
- अजितदादांना बरोबर घेऊन भाजपला पश्चाताप; तर वंचित बहुजन आघाडीला बरोबर घेऊन काँग्रेसच्या डोक्याला ताप!!
- Chhattisgarh : कुख्यात देवा बारसेचे 20 नक्षलवाद्यांसह आत्मसमर्पण, छत्तीसगडमध्ये दोन चकमकींत 14 नक्षली ठार
- PM Modi : पीएम मोदी म्हणाले- 125 वर्षांनी बुद्धांचे अवशेष भारतात आणले गेले; त्यांच्यासाठी ते अँटिक पीस होते, आपल्यासाठी सर्वकाही
- Venezuela : व्हेनेझुएलाच्या राष्ट्रपतींना अमेरिकेत आणले; डिटेंशन सेंटरमध्ये ठेवणार, अमेरिकेची धडक कारवाई