वृत्तसंस्था
मुंबई : महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेनेचे मंत्री आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे पुन्हा एकदा पेंग्विनच्या मुद्द्यावर अडकले आहेत. महाराष्ट्र सरकारमध्ये शिवसेनेसोबत सत्तेतील भागीदार असणाऱ्या काँग्रेसनेच पेंग्विनच्या मुद्द्यावर तीव्र आक्षेप नोंदवले आहेत. बीएमसीमधील सत्ताधारी शिवसेनेवर मोठा आरोप करण्यात आले आहेत.Congress Leaders Criticizes Aditya Thackeray Over BMC 15 Crore Rupees Tendor For penguin in Mumbai Zoo
बीएमसीचे विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी मुंबई प्राणिसंग्रहालयात ठेवलेल्या पेंग्विनच्या देखभालीसाठी जारी करण्यात आलेल्या 15 कोटींच्या टेंडरवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पेंग्विनची काळजी घेण्यासाठी बीएमसी डॉक्टरची नेमणूक करू शकते, परंतु असे असूनही कोट्यवधी रुपयांच्या निविदा काढून बाहेरून कंत्राटदाराची काय गरज आहे? असा सवाल त्यांनी केला आहे.
याआधीही मुंबईतील राणीची बाग प्राणिसंग्रहालयात पेंग्विन आणण्यावर आणि त्यांच्यावर होणाऱ्या खर्चाबद्दल वाद आणि विरोध झाला आहे. कॉंग्रेसचे नेते रवी राजा यांनी सांगितले की, कंत्राटदारांसाठी हे पेंग्विन एखाद्या सोन्याची अंडी घालणाऱ्या कोंबडीपेक्षा कमी नाही.
याआधी, बीएमसीने पेंग्विन खरेदी करण्यासाठी आणि त्यांना ठेवण्यासाठी बांधलेल्या चेंबरवर 25 कोटी खर्च केले आहेत. यानंतर त्यांच्या काळजीसाठी तीन वर्षांपर्यंत 11 कोटी रुपये खर्च केले गेले. आता देखभाल, एसी, लाइफ सपोर्ट सिस्टिम, इलेक्ट्रिकल सिस्टिम, डॉक्टर, पेंग्विनच्या अन्नासाठी निविदा काढली जात आहे.
पेंग्विनवरील खर्च किती?
- एका पेंग्विनवर दररोज 20 हजार खर्च केले जातात.
- एका दिवसात 7 पेंग्विनवर सुमारे 1.5 लाख खर्च होतात
- एका महिन्यात पेंग्विनवर 6 लाख खर्च होतात, तर 1 वर्षात पेंग्विनवर 71 लाख रुपये खर्च होतो.
- 7 पेंग्विनची 3 वर्षे काळजी घेण्यासाठी एकूण 15 कोटी खर्च.
- राणीच्या बागेत जेथे पेंग्विन ठेवले जातात, तेथे 3 ते 12 वयोगटातील मुलांसाठी 25 रुपयांचे तिकीट आहे.
- त्याचबरोबर 12 वर्षांवरील लोकांसाठी 50 रुपये तिकीट.
- बीएमसीला राणीच्या बागेतून वार्षिक 6 कोटींची कमाई.
गत दोन वर्षे कोविडमुळे उद्यान बंद आहे. यामुळे कमाईही पूर्ण बंद झाली आहे. अशा परिस्थितीत विरोधकांनी सवाल केलाय की, कोविडच्या या युगात बीएमसीच्या तिजोरीवर वाईट परिणाम झालेला असताना केवळ नेत्याच्या हट्टासाठी एवढा खर्च करण्याची गरज काय?
मात्र, बीएमसीची सत्ता असलेल्या शिवसेनेने विरोधकांनी लावलेले आरोप फेटाळले आहेत. शिवसेनेच्या नेत्या विशाखा राऊत यांनी म्हटले की, पेंग्विनने राणीच्या बागेचे वैभव वाढवले आहे आणि त्यांच्यावरील खर्च गरजेनुसारच केला जात आहे.
Congress Leaders Criticizes Aditya Thackeray Over BMC 15 Crore Rupees Tendor For penguin in Mumbai Zoo
विशेष प्रतिनिधी
- ‘पोस्टर बॉय इथेही खोडा घालताहेत’, सोलापूर विद्यापीठात पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या अश्वारूढ पुतळण्यासाठी पडळकरांचे राज्यपालांना पत्र
- गर्दीला निमंत्रण देणारे सर्व कार्यक्रम स्थगित करण्याचे मुख्यमंत्र्यांचे अगदी शिवसेनेलाही कळकळीचे आवाहन
- Reservation : मेडिकल कॉलेजच्या ऑल इंडिया कोट्यामध्ये आरक्षणाच्या निर्णयाला आव्हान, सुप्रीम कोर्टाची केंद्राला नोटीस
- ॲट्रोसिटी प्रकरण : करुणा शर्मा यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, तर त्यांच्या ड्रायव्हरला एका दिवसाची पोलीस कोठडी