विशेष प्रतिनिधी
मुंबई : Congress : मराठा आरक्षण आंदोलनाच्या मुद्द्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच टार्गेट करून भाजपच्या सगळ्या उमेदवारांना विधानसभा निवडणुकीत पाडण्याची प्रतिज्ञा करणाऱ्या मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा महाराष्ट्रात मोठा बोलबाला झाला, पण त्यांच्यापेक्षा काँग्रेसकडेच इच्छुकांचा धावा वाढला, असे आकडेवारीतूनच आता समोर आले आहे. Congress is more popular than manoj jarange
मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षण आंदोलनाचा टेम्पो वाढवत नेत त्यांच्या मास्टर्सना अपेक्षित असणारे टार्गेट विशिष्ट टप्प्यावर निवडले. अर्थातच ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा उपमुख्यमंत्री अजित पवार यांना टार्गेट करण्यापेक्षा मनोज जरांगे यांनी फडणवीस यांनाच टार्गेट केले. त्याचवेळी त्यांनी भाजपचे सगळे उमेदवार पाडा, असे आवाहन करत विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी चालवली.
जरांगे 900, काँग्रेस 1400
मनोज जरांगे पुढाकार घेऊन विधानसभा निवडणूक लढवणार म्हटल्यावर त्यांचे प्रभावक्षेत्र असलेल्या मराठवाड्यातले अनेक नेते त्यांच्याकडे धावले. त्यांच्या पाठिंब्याची आशा धरली. यामध्ये भाजप सह महायुतीचे नेतेही त्यामध्ये सामील झाले. मनोज जरांगेंकडे इच्छुक उमेदवारांच्या अर्जांचा खच पडला. या संदर्भातल्या बातम्या मराठी माध्यमांनी आकड्यांसकट दिल्या. त्यानुसार मनोज जरांगे यांच्याकडे 800 ते 900 इच्छुकांचे अर्ज आल्याचे बातम्यांमध्ये दिसून आले.
परंतु, याच कालावधीमध्ये काँग्रेसने आपल्या इच्छुकांना विशिष्ट रक्कम म्हणजे 10000 रुपये भरून अर्ज करायला सांगितले, त्यावेळी काँग्रेसकडे तब्बल 1400 पेक्षा जास्त अर्ज आल्याच्या बातम्या मराठी माध्यमांनी दिल्या. शरद पवारांचे राष्ट्रवादीकडे 500 ते 600 इच्छुकांनी अर्ज केल्याच्या बातम्या आल्या. Congress
पवारांचा पक्ष नंबर 3
याचा सरळ राजकीय अर्थ असा, की मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा महाराष्ट्रात फार मोठा बोलबाला झाला. परंतु, प्रत्यक्षात इच्छुकांचा धावा मात्र काँग्रेसकडेच वाढला. शरद पवारांच्या डाव टाकण्याच्या मुत्सद्देगिरीचा बोलबाला मराठी माध्यमांनी भरपूर चालवला. पण प्रत्यक्षात निवडणूक लढवण्याची इच्छा असणाऱ्यांची पवारांकडे गेलेल्यांची संख्या मात्र काँग्रेस आणि मनोज जरांगे यांच्या तुलनेत फारच कमी भरली. राजकीय कारणांसाठी सामाजिक आंदोलन उभे करणे निराळे आणि प्रत्यक्ष संघटित राजकीय पक्षामध्ये जाऊन त्याचे तिकीट मिळवून निवडणूक लढवणे निराळे याचीच लिटमस टेस्ट काँग्रेसने सर्वांत जास्त मार्कांनी पास केली, हेच 1400 + प्लस इच्छुकांच्या अर्जांनी सिद्ध केले. Congress
Congress is more popular than manoj jarange
महत्वाच्या बातम्या
- Tejashwi Yadav : सॅम पित्रोदा यांचा आत्मा तेजस्वी यादवमध्ये आहे का? – भाजपचा टोला!
- Haryana assembly elections : हरियाणा विधानसभा निवडणुकीची नवी तारीख जाहीर!
- Giriraj Singh attack : बेगुसराय येथे केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांच्यावर हल्ला
- Ladki Bahin Yojna In Nagpur : नागपुरात लाडक्या बहिणींच्या कार्यक्रमात कृतज्ञता आणि उत्साहाची अपूर्व जोड!!