• Download App
    Sushilkumar shinde सुशीलकुमारांनी सांगूनही काँग्रेसची वळली

    Sushilkumar shinde : सुशीलकुमारांनी सांगूनही काँग्रेसची वळली नाही हेकडी; सावरकर नावाची गेली नाही ऍलर्जी!!

    Sushilkumar shinde

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : Sushilkumar shinde माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे  ( Sushilkumar shinde ) यांनी आपल्या आत्मचरित्रात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या सामाजिक कार्याची महती गायली. त्यांना केवळ हिंदुत्वाच्या चष्म्यातून पाहू नका. त्यांचा सामाजिक पुरोगामी विचार, विज्ञाननिष्ठा, अस्पृश्यता उद्धार या कामांकडे लक्ष द्या. सावरकरांच्या विषयीच्या धोरणात सुधारणा करा, अशा स्पष्ट शब्दात सुशीलकुमारांनी काँग्रेस नेत्यांना लेखी सुनावले. पण काँग्रेस नेत्यांची हेकडी काही वळली नाही. त्यांची सावरकर नावाची ऍलर्जी अद्याप गेलीच नाही.Sushilkumar shinde



    शिंदे – फडणवीस सरकारने वीर सावरकर चॅरिटेबल ट्रस्टला मुंबईत शाळा सुरू करण्यासाठी वडाळा सॉल्ट पॅन महसूल विभागात विनामूल्य जमीन दिली. त्या संदर्भातल्या बातम्या मराठी माध्यमांनी चालविल्या. महसूल विभाग आणि वनविभागाने अशाप्रकारे जमीन द्यायला विरोध केला होता, तरी शिंदे – फडणवीस सरकारने सावरकर चारिटेबल ट्रस्टला सुमारे पावणेतीन एकर जमीन दिली, असे त्या बातम्यांमध्ये नमूद केले. वास्तविक हा राज्य शासनाचा निर्णय आहे. त्यातही तो मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला गेला आहे. त्यामुळे महसूल विभाग आणि वन विभाग मंत्रिमंडळाच्या पलीकडचे कुठले घटक आहेत असे समजायचे काही कारण नाही. तरी देखील माध्यमांनी महसूल आणि वनविभागाच्या विरोधाचा उल्लेख करून संबंधित बातम्या रेटून चालविल्या.

    या बातम्यांवरून काँग्रेसचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांनी संबंधित जमीन वीर सावरकर ट्रस्टला देण्याच्या निर्णयावर टीका केली. मोक्याच्या ठिकाणच्या जमिनी कवडीमोल भावाने विकायचे काम चालू आहे सरकारने पूर्ण राज्यच विकायला काढले आहे, असा दावा थोरात यांनी केला.

    राहुल गांधींनी सावरकरांना “माफीवीर” म्हटले. पण देशभरातल्या विविध न्यायालयांमध्ये खटले दाखल झाल्यावर ते नंतर मूग गिळून गप्प बसायला लागले, पण म्हणून काँग्रेसी नेत्यांचा सावरकर द्वेष थांबला नाही. परवाच कर्नाटक मधले मंत्री दिनेश गुंडूराव यांनी सावरकर गोमांस खात असल्याची अश्लाघ्य टीका केली. त्यांच्याविरुद्ध स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक खटला दाखल करणार आहे. त्या पाठोपाठ आज शिंदे – फडणवीस सरकारने वीर सावरकर चॅरिटेबल ट्रस्टला शाळा सुरू करण्यासाठी जमीन दिल्याबद्दल काँग्रेसच्या नेत्यांनी त्या निर्णयावर टीका केली.

    Congress has permanent allergy of savarkar’s name

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस