• Download App
    बिल्डरच्या घशात महाविद्यालयाची जागा तरीही शिक्षणमंत्र्यांकडून दखल नाही, कॉाग्रेसच्या सरचिटणिसांनी सोनिया गांधींकडे केली वर्षा गायकवाड यांची तक्रार|Congress general secretary complaints about Varsha Gaikwad to Sonia Gandhi

    बिल्डरच्या घशात महाविद्यालयाची जागा तरीही शिक्षणमंत्र्यांकडून दखल नाही, कॉाग्रेसच्या सरचिटणिसांनी सोनिया गांधींकडे केली वर्षा गायकवाड यांची तक्रार

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : महाविद्यालयाची जागा बिल्डरच्या घशात जाण्यापासून वाचविण्यासाठी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना अनेक विनवण्या केल्या. परंतु, त्यांनी दखल न घेतल्यामुळे कॉँग्रेसच्या  प्रदेश सरचिटणिसांनी गायकवाड यांची तक्रार थेट कॉँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींकडे केली आहे.Congress general secretary complaints about Varsha Gaikwad to Sonia Gandhi

    काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस राजेश शर्मा यांनी महाविद्यालयाच्या जागेसंदर्भात गायकवाड यांच्याकडे अनेक तक्रारी केल्या होत्या. त्याची योग्य दखल न घेतल्यामुळे त्यांनी ही तक्रार केली आहे. चिनाय आणि एमव्हीएलयू ही कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालये अनुदानित महाविद्यालये आहेत.



    या ठिकाणी 800 हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेऊ शकतात. मात्र महाविद्यालयाची ही जागा खासगी बिल्डरांच्या घशात घातली जाणार आहे. यामुळे ही महाविद्यालये वाचविण्यासाठी शर्मा यांनी वर्षा गायकवाड यांच्याकडे वेळोवेळी महाविद्यालयाची जागा वाचविण्याची मागणी केली होती.

    आपण केलेल्या तक्रारीला गायकवाड यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही, असा  शर्मा यांचा आरोप आहे.  याच कारणामुळे आपण काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहून याविषयी तक्रार केली, अशी माहिती राजेश शर्मा यांनी दिली.

    Congress general secretary complaints about Varsha Gaikwad to Sonia Gandhi

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Ajit Pawar : प्रत्येकजण आपला पक्ष वाढवण्याच्या प्रयत्नात असतो; शिवसेना शिंदे गटाच्या नाराजीवर अजित पवारांची प्रतिक्रिया

    Anjali Damania : पार्थ पवारांचे जमीन घोटाळा प्रकरण, न्यायालयामध्ये जाण्याचा दमानियांनी दिला इशारा

    Uday Samant : शिंदे गटाने फेटाळली नाराजीची चर्चा, मंत्री उदय सामंत म्हणाले – आमचे गाऱ्हाणे मुख्यमंत्र्यांना नाही तर कुणाला सांगणार