विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या इंधन दरवाढी विरोधातील आंदोलनात बैलगाडीवरून भाई जगताप व अन्य कॉंग्रसेचे नेते खाली पडल्यामुळे झालेले कॉंग्रेसचे हसू संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले, अशी टीका विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली. Congress fell from the bullock cart; Overwhelmed and smiled
इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसने राज्यातील विविध ठिकाणी आंदोलन केले. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्या नेतृत्वात मुंबईत हे आंदोलन पार पडले. यावेळी पेट्रोल, डिझेलच्या निषेधार्थ बैलगाडीवरून मोर्चा काढला होता. मात्र, आंदोलनादरम्यान बैलगाडी तुटली व काँग्रेस कार्यकर्त्यांसह भाई जगतापही खाली पडले. यावर प्रतिक्रिया देताना दरकेर म्हणाले की, राहुल गांधी जिंदाबाद घोषणा देत असताना माणसाचे तर दूरंच राहिले पण बैलालाही ते सहन झाले नसावे.
दरकेर म्हणाले, इंधन दरवाढी विरोधातील मोर्च्यात एकाच वेळी या बैलगाडीवर अनेक कार्यकर्ते व नेते उभे होते. त्यामुळे वेळातच बैलगाडीचा हा भाग वेगळा होऊन तुटला आणि कार्यकर्ते खाली पडले. परंतु बैलगाडीवर असेलेल्या महिलांचाही विचार केला गेला नाही. त्यामुळे हे आंदोलन विस्कळीत आणि अनियोजन पद्धतीने पार पडेल. एका बाजूला राज्य सरकार कोरोना वाढल्याचे सांगत असताना दुसरीकडे सत्ताधारी पक्षातील नेते व कार्यकत्यांनी आंदोलनाच्या नावाखाली सोशल डिस्टंसिंग फज्जा उडविला व कोरोनाचे नियमही धाब्यावर बसवल्याचा असा आरोप दरेकर यांनी केला.
- बैलगाडीवरून भाई जगताप व कॉंग्रसेचे नेते पडले
- इंधन दरवाढी विरोधातील कॉंग्रेसचे आंदोलन
- आंदोलनाचे झालेले हसू महाराष्ट्राने पाहिले
- बैलालाही घोषणा सहन झाल्या नाहीत
- भाजप नेते प्रविण दरेकर यांची टिका
- आंदोलनाच्या नावाखाली सोशल डिस्टंसिंग फज्जा
- कोरोनाचे नियमही धाब्यावर बसविल्याचा आरोप
Congress fell from the bullock cart; Overwhelmed and smiled
महत्त्वाच्या बातम्या
- अॅप खरेदीसाठी दुसरा पर्याय नाही, गुगलच्या विरोधात कायदेभंगाचा अमेरिकेतील ३६ प्रांतांचा न्यायालयात दावा
- सोबत राहून पाठीत सुरा खुपसण्याचे काम, कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची अजित पवारांवर टीका
- ब्लॉक प्रमुखांच्या निवडणुकांतही भाजपचाच झेंडा, योगी सरकारच्या धोरणांचा विजय असल्याचे म्हणत पंतप्रधानांनी केले कौतुक
- जॉर्जियाला भारताकडून भावपूर्ण भेट, सतराव्या शतकातील राणी सेंट क्वीन केटवनचे पवित्र अवशेष सरकारला सोपविले
- नितीन गडकरी यांना हे शहर बनवायचे आहे भारताचे स्वित्झर्लंड, स्केइंगसाठी जगभरातून येतील पर्यटक