विशेष प्रतिनिधी
मुंबई : थोरला नाही, धाकटा नाही, भाऊबंदकी चालणार नाही, असे सांगत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने महाविकास आघाडीतल्या जागा वाटपासाठी नवा मेरिट फॉर्म्युला आणला आहे. विरोधी पक्ष नेते अजित पवारांनी महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस आता थोरला भाऊ आहे, असा दावा केल्यानंतर जागावाटपासंदर्भात जे राजकीय घमासान सुरू झाले. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने मेरिट फॉर्म्युला पुढे आणला आहे.Congress brings in new merit formula in seats sharing in MVA
महाविकास आघाडीतील जागावाटप मेरिटनुसार होईल. जागा वाटपाचा निर्णय मेरिटवर निर्णय झाला तर अनावश्यक चर्चा थांबेल, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सोमवारी स्पष्ट केले. प्रत्येक पक्षाने जागांची चाचपणी केली तर त्यात काही गैर नाही, असे सांगताना पटोले यांनी प्रदेश काँग्रेसने संभाव्य जागांसाठी समित्या नेमल्याची माहिती दिली. भाजपाला पराभूत करणे यासाठी आमचे काम सुरू आहे, असे नाना पटोले म्हणाले.
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी महाविकास आघाडीत राष्ट्रवादी मोठा भाऊ झाला आहे, असे सांगत राष्ट्रवादीला जागा जास्त मिळाव्यात असे सूचित केले होते, त्यावर ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी विरोध केला होता, पण आता काँग्रेसने नवा फॉर्म्युला मांडला आहे.
महविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या तीन प्रमुख पक्षांनी आगामी लोकसभा आणि त्यानंतर होऊ घातलेली विधानसभा निवडणूक एकत्र लढविण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या निर्णयात जागावाटपाचा मुद्दा अतिशय कळीचा आहे. महाविकास आघाडीत मोठा भाऊ कोण यावरून नव्या वादाला तोंड फुटले, तर ठाकरे गटाने लोकसभेच्या १९ जागांवर दावा केला आहे. त्यामुळे जागावाटपाची प्रत्यक्ष चर्चा सुरु होण्यापूर्वी आघाडीत जागावाटपावरून रस्सीखेच सुरु झाली आहे. या पार्श्वभूमीवर आज प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना नाना पटोले यांनी जागावाटप मेरिटवर निर्णय होईल, असे सांगितले.
Congress brings in new merit formula in seats sharing in MVA
महत्वाच्या बातम्या
- पुणे महानगरपालिकेचं पुरोगामी पाऊल; तृतीयपंथीयांना सेवेत सामावून घेतलं जाणार
- बिग बॉस मध्ये गेल्यावर भल्याभल्यांची इमेज खराब होते माझी मात्र सुधारली.. तृप्ती देसाई..
- देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून प्रथमच सावरकर जयंतीचा आठवडाभर प्रचंड धुमधडाका!!
- भाजपा २०२४ च्या निवडणुकीपूर्वी ओडिशातील एक कोटी कुटुंबांशी साधणार संपर्क