विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : Congress and AAP आगामी दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत आपण स्वबळावर लढू, अशी गर्जना सुरुवातीला आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाले यांनी केली होती, पण हरियाणा आणि महाराष्ट्राचा अनुभव लक्षात घेऊन त्यांनी आपले “स्वबळ’ गुंडाळून ठेवत काँग्रेसची मैत्रीचा हात पुढे केला आहे. पण हा हात पुढे करताना काँग्रेसला दिल्ली विधानसभेच्या 70 पैकी फक्त 15 जागांवर गुंडाळण्याचा केजरीवालांचा इरादा समोर आला आहे. Congress and AAP
दिल्ली विधानसभेत एकूण 70 जागा आहेत. त्यापैकी सध्या आम आदमी पार्टीकडे 62 आमदार आहेत. त्यामुळे आम आदमी पार्टी दिल्लीत जोरावर आहे. त्यामुळेच फेब्रुवारी 2025 मध्ये होणारी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवण्याची घोषणा अरविंद केजरीवाल यांनी केली होती. त्या दृष्टीने तयारी करून काही उमेदवार देखील त्यांनी जाहीर केले.
परंतु, महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभेच्या निवडणुकीचा अनुभव सगळ्याच विरोधी पक्षांना मोठा धक्का देऊन गेला, आपण एकजुटीने लढलो नाही, तर भाजप आपले पानिपत करू शकतो, याचा अंदाज केजरीवाल यांना आला. त्यामुळे केजरीवालांनी काँग्रेस पुढे मैत्रीचा हात केला, पण हा मैत्रीचा हात फक्त 15 जागांपुरताच मर्यादित ठरला. अन्य एक – दोन जागा बाकीच्या मित्र पक्षांना सोडायची तयारी केजरीवालांनी दाखविली.
दिल्लीत एकेकाळी काँग्रेसने सत्ता गाजवली होती. शीला दीक्षित काँग्रेस सरकारच्या तीन टर्म मुख्यमंत्री होत्या. परंतु त्याच काँग्रेसला आम आदमी पार्टीने आता विधानसभेच्या फक्त 15 जागा देऊन गुंडाळायाची तयारी चालवली आहे. काँग्रेसने मात्र अद्याप केजरीवालांच्या प्रस्तावाला प्रतिसाद दिलेला नाही.
Congress and AAP are in the final stages of agreement
महत्वाच्या बातम्या
- Devendra Fadnavis : पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी उद्घाटन
- Bangladesh : बांगलादेशातल्या हिंदूंवरच्या अत्याचाराबाबत मानवाधिकारवाले मूग गिळून गप्प का??
- vishwakarma scheme : केंद्राच्या विश्वकर्मा योजनेपासून लाखो तमिळ युवकांना वंचित ठेवण्याचे तामिळनाडूच्या द्रमुक सरकारचे कारस्थान!
- Himachal Pradesh : हिमाचल प्रदेशातील कुल्ली येथे भीषण अपघात, प्रवाशांनी भरलेली बस दरीत कोसळली