• Download App
    Congress काँग्रेसच्या सर्व्हेत काँग्रेसच नंबर 1, पण ठाकरेंच्या शिवसेनेला तिसरे स्थान; नेमका अर्थ काय??

    Congress : काँग्रेसच्या सर्व्हेत काँग्रेसच नंबर 1, पण ठाकरेंच्या शिवसेनेला तिसरे स्थान; नेमका अर्थ काय??

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने महायुती वर मात केली. त्यातही काँग्रेस अव्वल कामगिरीसह नंबर 1 चा पक्ष ठरला. त्यामुळे हुरूप वाढलेल्या काँग्रेसने विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने सर्वेक्षण करून आपली निवडणूक तयारी चालवली आहे. या सर्वेक्षणाचा काही भाग वेगवेगळ्या प्रसिद्धी माध्यमांना मिळाला असून त्यांनी तो आपापल्या मगदूरानुसार प्रसिद्ध केला आहे.

    काँग्रेसने महाराष्ट्रात केलेल्या सर्वेक्षणात अर्थातच काँग्रेसलाच पहिले स्थान मिळाले असून शरद पवारांच्या राष्ट्रवादीला दुसरे, तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला तिसरे स्थान मिळाले आहे. काँग्रेसच्या सर्वेक्षणानुसार विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला 80 ते 85, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 55 ते 60 तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला 30 ते 32 जागा मिळण्याची शक्यता असल्याचे निष्कर्ष नमूद केले आहे.

    तर महायुतीमध्ये भाजपला तब्बल 50 जागांचा फटका बसून भाजप 60 ते 62 जागांवर, एकनाथ शिंदे यांची शिवसेना 30 ते 32 जागांवर, तर अजित पवारांची राष्ट्रवादी फक्त 10 जागांवर अडकण्याची शक्यता काँग्रेसच्या सर्वेक्षणाने वर्तवली आहे.


    Jay Shah : जागतिक क्रिकेटवर भारताचा दबदबा; ICC च्या अध्यक्षपदी जय शाह; पाचवे भारतीय अध्यक्ष!!


    ठाकरेंच्या शिवसेनेत मारली मेख!!

    अर्थातच महाविकास आघाडी महाराष्ट्रात सत्तेवर येणार हे काँग्रेसच्या सर्वेक्षणात स्पष्ट दाखविले आहे, पण या सर्वेक्षणाची खरी “राजकीय मेख” अशी की, काँग्रेसने उद्धव ठाकरेंच्या पक्षाला तिसरे स्थान मिळण्याची शक्यता वर्तवली आहे. उद्धव ठाकरेंची शिवसेना पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंनाच मुख्यमंत्री करण्याच्या चंग बांधून बसली आहे. त्यासाठी उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी थेट सोनिया गांधींचे 10 जनपथ गाठले होते. दिल्लीत बसून मोठे लॉबिंग केले होते.

    कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रात पुन्हा मुख्यमंत्री व्हायचे हाच उद्धव ठाकरेंचा मनसूबा असताना महाविकास आघाडीत जर त्यांचे स्थान पहिले तर सोडाच, दुसरेही उरले नाही आणि ते तिसऱ्यावर घसरले, तर काँग्रेसचे नेते उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करणार का??, हा कळीचा सवाल आहे. काँग्रेसने आपल्या सर्वेक्षणाच्या निष्कर्षातून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत ही “राजकीय मेख” मारून महाराष्ट्रातला आपला मार्ग निष्कंटक करण्याचा प्रयत्न केला आहे.

    Congress survey gives 3 rd position to thackeray shivsena

    महत्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Devendra Fadnavis : सहकाराच्या सक्षमीकरणासाठी कायद्यात बदल आवश्यक – देवेंद्र फडणवीस

    state government : संरक्षण दल अन् राज्य सरकार यांच्यात महत्त्वपूर्ण समन्वय बैठक

    Devendra Fadnavis : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यामुळे भारतीय स्वातंत्र्यलढ्याला कलाटणी मिळाली – देवेंद्र फडणवीस