नाशिक : नाशिक मधल्या मोठ्या मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या स्वतंत्र आणि वेगळ्या विद्यापीठाबद्दल शरद पवारांच्या नाशिक दौऱ्याच्या निमित्ताने मोठा संभ्रम निर्माण झाला. मराठा विद्या प्रसारक संस्थेने अर्थात मविप्रने स्वतंत्र विद्यापीठ काढावे, असे सत्ताधारी गटाचे म्हणणे आहे, तर विरोधी गटाचा स्वतंत्र विद्यापीठाला विरोध आहे. महत्त्वाचे म्हणजे दोन्ही गटांच्या नेत्यांनी आज नाशिकमध्ये शरद पवारांची भेट घेतली. त्यानंतर दोन्ही गटांच्या नेत्यांनी शरद पवार नेमके काय म्हणाले??, त्या संदर्भात परस्पर विरोधी दावे केले. MVP University
मराठा विद्या प्रसारक संस्थेचे संस्थेचे अध्यक्ष सुनील ढिकले यांच्या नेतृत्वाखालचे शिष्टमंडळ शरद पवारांना भेटले. त्यावेळी त्यांनी मविप्रच्या स्वतंत्र विद्यापीठाचे समर्थन केले. परंतु, शरद पवारांनी वेगवेगळी कारणे देऊन स्वतंत्र विद्यापीठ उभारणे योग्य नसल्याचे मत व्यक्त केल्याचे सुनील ढिकले यांनी सांगितले. मविप्र संस्थेत दहा हजार सभासद आहेत. त्याचबरोबर रयत शिक्षण संस्थेत सुद्धा प्रचंड संख्येने सभासद आहेत. बारामती विद्या प्रतिष्ठान मध्ये सुद्धा 35 हजार पेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेतात. परंतु रयत शिक्षण संस्था आणि बारामती विद्या प्रतिष्ठान यांनी स्वतंत्र विद्यापीठाचा निर्णय घेतला नाही. कारण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आज देशातले एक नंबरचे विद्यापीठ आहे. त्या विद्यापीठाच्या पदवीला जगभरात मान्यता आहे. जर स्वतंत्र विद्यापीठे झाली, तर पुण्याच्याच परिसरातल्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या ठिकाणच्या पदव्या मिळतील ते योग्य ठरणार नाही. त्यामुळे आम्ही स्वतंत्र विद्यापीठ करण्याचा निर्णय टाळला, तसा तुम्ही टाळला पाहिजे, असे शरद पवारांनी मविप्र संस्थेच्या विद्यापीठाच्या स्थापनेसंदर्भात सांगितल्याचे सुनील ढिकले यांनी पत्रकारांना सांगितले.
– नितीन ठाकरे पवारांना भेटले
परंतु सुनील ढिकले भेटून गेल्यानंतर मविप्रचे सरचिटणीस नितीन ठाकरे हे शिष्टमंडळासह शरद पवारांच्या भेटीला पोहोचले. तिथे त्यांनी शरद पवारांना व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी मविप्र संस्थेच्या स्वयंसहाय्यक विद्यापीठाची गरज असल्याचे सांगितले. शरद पवारांनी आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी आपले म्हणणे ऐकून घेतले. स्वतंत्र विद्यापीठा संदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले. मविप्र संस्थेच्या वाटचाली संदर्भात समाधान व्यक्त करून पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या, असे नितीन ठाकरे यांनी शरद पवारांच्या भेटीनंतर फेसबुक पोस्टवर लिहिले.
– परस्पर विरोधी मते
पण त्यामुळे शरद पवारांचा मविप्र प्रसंस्थेच्या स्वतंत्र विद्यापीठाला पाठिंबा आहे की पाठिंबा नाही??, याविषयी मोठा संभ्रम तयार झाला. दस्तूरखुद्द शरद पवारांचे या संदर्भातले वक्तव्य समोर आले नाही, पण दोन भिन्न भिन्न गटांमधल्या त्यांच्या अनुयायांनी मात्र शरद पवारांनी आपापल्या गटांना अनुकूल मते व्यक्त केली, असे सांगून मोठा संभ्रम तयार केला.
Confusion over independent MVP University in Nashik
महत्वाच्या बातम्या
- राहुल गांधींचे ‘व्होट चोरी’ कागदपत्र तर परदेशात तयार! म्यानमार कनेक्शन उघड, काँग्रेस बचावाच्या भूमिकेत
- Election Commission : निवडणूक आयोगाची राज्य अधिकाऱ्यांसोबत बैठक; मतदार पडताळणीवर चर्चा; बिहारमध्ये आधार कार्डला 12वे दस्तावेज म्हणून ग्राह्य धरण्याचे निर्देश
- Vote chori चोरीच्या आरोपांचे म्यानमार मध्ये डिजिटल धागेदोरे; राहुल गांधींच्या परदेश दौऱ्यांवर संशयाचे वारे!!
- याला म्हणतात, अमेरिकन भां