• Download App
    Aghori puja महायुतीतील संघर्ष तीव्र; सूरज चव्हाण

    Aghori puja : महायुतीतील संघर्ष तीव्र; सूरज चव्हाण यांनी भरत गोगावले यांचा अघोरी पूजेचा व्हिडिओ केला पोस्ट

    Aghori puja

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : Aghori puja  रायगडच्या पालकमंत्रिपदावरून सुरू असलेला महायुतीतील शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील संघर्ष आता आणखीनच चिघळला आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी थेट शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांचा अघोरी पूजेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत नवा वाद पेटवला आहे.Aghori puja

    हा व्हिडिओ पोस्ट करताना सूरज चव्हाण यांनी टोला लगावत म्हटले आहे की “बाबा भरतशेठ + आघोरी विद्या = पालकमंत्री?” यावरून त्यांनी असा आरोप केला आहे की रायगडचे पालकमंत्रिपद मिळवण्यासाठी भरत गोगावले यांनी अघोरी पूजा केली.

    व्हिडिओमध्ये भरत गोगावले टॉवेलवर खुर्चीवर बसलेले दिसतात. त्यांच्या समोर काळे कपडे घातलेला एक मांत्रिक आणि दोन भगवे वस्त्रधारी व्यक्ती उभ्या आहेत. टेबलावर पूजा साहित्य असून मांत्रिक विधी करताना दिसतो. मात्र व्हिडिओमध्ये संवाद ऐकू येत नाही.



    हा प्रकार नवीन नाही. दोन दिवसांपूर्वी शिवसेना (ठाकरे गट) नेते वसंत मोरे यांनी आरोप केला होता की, 18 ऑक्टोबर 2024 रोजी भरत गोगावले यांनी उज्जैनच्या बागलामुखी देवीच्या मंदिरात 11 महाराजांसह पूजा केली होती आणि नंतर ते स्वतःच्या घरीही पूजाअर्चा झाली होती. “तुमचा कामावर विश्वास नाही का? मग अशा अंधश्रद्धेचा आधार का?” असा सवाल मोरे यांनी केला होता. त्यांनी हेही सांगितले की, या पूजेसाठी बाहेरच्या राज्यांतील मांत्रिकांना पाचारण करण्यात आले होते आणि त्यांच्या कडे या पूजेचे व्हिडीओ उपलब्ध आहेत. गोगावले यांनी हे खोडून काढल्यास अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे तक्रार करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला होता.

    महत्त्वाचे म्हणजे, विधानसभा निवडणुकीनंतर महायुती सत्तेत आली असली तरी रायगड जिल्ह्याचा पालकमंत्री अद्याप निश्चित झालेला नाही. सुरुवातीला राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली होती, पण शिंदे गटाच्या नाराजीमुळे ती नियुक्ती स्थगित करण्यात आली. त्यानंतरपासूनच या पदावरून महायुतीत अंतर्गत संघर्ष सुरू आहे.

    या पार्श्वभूमीवर भरत गोगावले यांचा मांत्रिकासोबतचा व्हिडिओ पोस्ट करत सूरज चव्हाण यांनी पुन्हा एकदा पालकमंत्रिपदाचा मुद्दा उघडपणे चर्चेत आणला आहे.

    Conflict within the Mahayuti is intense; Suraj Chavan posts a video of Bharat Gogavale performing Aghori puja

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Bachchu Kadu : बच्चू कडू आज मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार; चर्चा अयशस्वी ठरल्यास ‘रेल रोको’चा इशारा

    Mazi Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना लवकरच ऑक्टोबरचा लाभ मिळणार; 410.30 कोटींचा निधी वितरीत करण्यास मान्यता

    Nilesh Ghaiwal, : लंडनमध्ये नीलेश घायवळचा ठावठिकाणा सापडला; यूके हाय कमिशनकडून पुणे पोलिसांना माहिती