नाशिक : राष्ट्रवादीत ज्येष्ठ नेत्यांना डावल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली त्यानंतर कोळी टोपी घालून सुनील तटकरे थेट मंत्री नितेश राणे यांच्याबरोबर एकाच रथात मिरवणुकीत सामील झाले.Conflict within NCP, Fadnavis’ meeting; then Sunil Tatkare wearing a Koli topi in a procession with Nitesh Rane in the same chariot!!
– भरडखोल बंदरामुळे मच्छीमारांच्या विकासाला नवी दिशा
रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील भरडखोल येथील मासेमारी बंदराच्या विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा राज्याचे मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री श्री. नितेशजी राणे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या सोहळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे असलेले आणि नसलेले प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे हे सुद्धा सामील झाले.
स्वतः सुनील तटकरे यांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवर या कार्यक्रमाचे फोटो शेअर केले. नितेश राणे आणि सुनील तटकरे कोळी टोपी घालून एकाच रथातून मिरवणुकीत सामील झालेले सुद्धा दिसले.
मच्छीमार बांधवांना सुरक्षित आणि आधुनिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी भरडखोल येथे सुसज्ज मत्स्यबंदर विकसित करण्यात येत आहे. शासनाच्या माध्यमातून ही विकासकामे दर्जेदार आणि नियोजित वेळेत पूर्ण करण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत.
या प्रकल्पामुळे मत्स्य व्यवसायाला मोठी चालना मिळणार असून स्थानिक मच्छीमार बांधवांच्या आर्थिक प्रगतीलाही गती मिळणार आहे. राज्य सरकारने मत्स्य विभागासाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला असून ‘मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना’सह विविध योजनांचा लाभ मच्छीमारांनी घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले. यावेळी स्थानिक कोळी बांधव, ग्रामस्थ तसेच पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते, असे सुनील तटकरे यांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवर लिहिले.
त्यामुळे सुनील तटकरे यांना राष्ट्रवादीतून डावलले गेले असले, तरी त्यांनी स्वतःच्या राजकीय अस्तित्वासाठी वेगळ्या हालचाली सुरू करून भाजपच्या मंत्र्यांबरोबर जवळीक साधल्याचे स्पष्ट झाले.
Conflict within NCP, Fadnavis’ meeting; then Sunil Tatkare wearing a Koli topi in a procession with Nitesh Rane in the same chariot!!
महत्वाच्या बातम्या
- प्रशांत किशोर संदर्भात बातमी आल्यानंतर लगेच पार्थ पवारांचा खुलासा; पण राष्ट्रवादीतल्या राजकीय गदारोळाबद्दल मात्र मौन!!
- पश्चिम बंगाल प्रमाणेच उत्तर प्रदेशात काँग्रेस लागली कामाला; भाजपची सत्ता आणायला!!
- महाराष्ट्रातील विविध तीर्थक्षेत्रे, गडकिल्ले आणि ऐतिहासिक स्थळांच्या विकासासाठी ₹993 कोटींच्या कामांना मान्यता
- CM Yogi Adityanath : योगी म्हणाले- रस्त्यावर नमाज पढू देणार नाही; प्रेमाने ऐकले तर ठीक, नाहीतर दुसरा मार्ग अवलंबू