• Download App
    मेधा किरीट सोमय्यांची संजय राऊतांविरोधात मुलूंडच्या नवघर पोलीस ठाण्यात तक्रार Complainant further stated that the accused's intention was to criminally intimidate

    मेधा किरीट सोमय्यांची संजय राऊतांविरोधात मुलूंडच्या नवघर पोलीस ठाण्यात तक्रार

    वृत्तसंस्था

    मुंबई : भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या पत्नी प्रोफेसर डॉ. मेधा किरीट सोमय्या यांनी सामनाचे कार्यकारी संपादक शिवसेनेचे प्रवक्ते, राज्यसभेचे माजी खासदार संजय राऊत यांच्याविरोधात मुलुंडच्या नवघर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. Complainant further stated that the accused’s intention was to criminally intimidate

    संजय राऊत हे पुराव्यांची शिवाय आपली बदनामी करत असतात. आपण ने केलेल्या गुन्ह्यात आपल्याला अडकवण्याचा संजय राऊत यांचा कुटील हेतू आहे. यासाठी त्यांच्या विरुद्ध फौजदारी कलम 503 509 आणि 500 नुसार गुन्हा दाखल करावा, असा अर्ज डॉ. मेधा किरीट सोमय्या यांनी पोलीस ठाण्यात दिली आहे. पुराव्याशिवाय एखाद्याची बदनामी करणे या संदर्भातली ही कलमे असून त्यामध्ये तीन वर्षांची शिक्षा आणि दंडाची तरतूद आहे.

    किरीट सोमय्या आणि संजय राऊत या दोघांमध्ये राजकीय हमरीतुमरी सुरू आहे. किरीट सोमय्या यांनी संजय राऊतांविरोधात ईडीकडे तक्रारी केल्या. याच तक्रारीवरून संजय राऊत यांचे निकटवर्ती प्रवीण राऊत यांना पत्राचाळ घोटाळा प्रकरणात ईडीने अटक केली आहे. आता त्या पुढची कारवाई संजय राऊत यांच्यावर होणे अपेक्षित आहे.

    संजय राऊत यांनी या पार्श्वभूमीवर किरीट सोमय्या यांचे चिरंजीव नील सोमय्या आणि पत्नी मेधा सोमय्या यांच्यावर पीएनबी बँक घोटाळ्यातील आरोपी वाधवानशी संबंध असल्याचे आरोप लावले आहेत. यासंदर्भात सामनामध्ये त्यांनी अग्रलेख लिहिले आहेत. परंतु याच अग्रलेखांनी आपली बदनामी होण्यात होत असल्याचा दावा डॉ. मेधा सोमय्या यांनी करत संजय राऊत यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. आता पोलीस त्यावर नेमके काय ऍक्शन घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

    Complainant further stated that the accused’s intention was to criminally intimidate

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    पाकिस्तानच्या विनंतीनंतरच भारताने सध्या थांबविले firing; सिंधू जल करार राहणार स्थगितच, त्यात नाही बदल!!

    Judge Cash case : जज कॅश केस, सरन्यायाधीशांनी PM-राष्ट्रपतींना अहवाल सोपवला; तीन न्यायाधीशांच्या समितीकडून चौकशी

    अमेरिका + पाकिस्तान यांनीच ceasefire शब्द वापरला; भारताने फक्त firing आणि military action थांबविल्याचे सांगितले; याचा नेमका अर्थ काय??