• Download App
    येरवडा इमारत दुर्घटना प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती|Committee of Inquiry under the chairmanship of District Collector in Yerawada building accident case

    येरवडा इमारत दुर्घटना प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती

    पुण्यातील येरवड्यामधील शास्त्रीनगर परिसरात वाडिया बंगल्याजवळ इमारतीच्या स्लॅबची जाळी कोसळून पाच कामागारांचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. या अपघातामध्ये अन्य पाच कामगार गंभीर जखमी झाले आहेत. या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्यात आली आहे. तर, येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.Committee of Inquiry under the chairmanship of District Collector in Yerawada building accident case


    विशेष प्रतिनिधी

    पुणे : पुण्यातील येरवड्यामधील शास्त्रीनगर परिसरात वाडिया बंगल्याजवळ इमारतीच्या स्लॅबची जाळी कोसळून पाच कामागारांचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. या अपघातामध्ये अन्य पाच कामगार गंभीर जखमी झाले आहेत. या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्यात आली आहे. तर, येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    येरवडा पोलिसानी ब्ल्यू ग्रास बिजनेस पार्क कन्स्ट्रक्शन साईटच्या अनंता कंपनी, अहलुवालिया कॉन्ट्रॅक्टर प्रा. लि.चे मोहन अवलकर, एमसिपीएल कंपनीचे लेबर सुपवायझर शरीफ, सिएनडब्ल्यू कंपनीचे सेफ्टी सुपरवायझर सतीश यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मोहम्मद नाहीद मोहम्मद मास्टर (वय 21, रा. लेबर कॅम्प, येरवडा, मूळ रा कटीहार, बिहार) यांनी फिर्याद दिली आहे.



    या घटनेत सोहेल मोहम्मद (वय 22), मोहम्मद समीर (वय 30), मोबीद आलम (वय 40), मजरूम हुसेन (वय 35), तकाजी आलम (वय 40) मृत्युमुखी पडले आहेत. तर, मोहम्मद आलम मोहम्मद इब्राहिम, मोहम्मद फईम, मोहम्मद रफिक आलम, मोहम्मद साहिल मोहम्मद मुस्लिम अशी जखमींची नावे आहेत.

    या घटनेची संपूर्ण चौकशी करण्याकरिता जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. झोन क्रमांक चारचे पोलीस उपायुक्त रोहिदास पवार, सहायक संचालक, नगररचना अभिजित केतकर, अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग अतुल चव्हाण, मुख्य अग्निशमन अधिकारी सुनील गिलबिले,

    कामगार कल्याण विभाग उपायुक्त अभय गिते, स्ट्रक्चरल इंजिनिअर धैर्यशील खैरे पाटील, आर्किटेक्ट संदीप बावडेकर, क्रेडाईचे संजय देशपांडे, अधीक्षक अभियंता बांधकाम विभाग पुणे महानगर पालिका सुधीर कदम यांचा सदस्य म्हणून या समितीमध्ये समावेश करण्यात आला आहे.

    Committee of Inquiry under the chairmanship of District Collector in Yerawada building accident case

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    लोकसभेत धडाडणार भाजपकडून कायद्याची तोफ; उत्तर मध्य मुंबईतून उज्ज्वल निकमांना उमेदवारी!!

    लोकसभेला फिस्कटले तरी प्रकाश आंबेडकरांचा विधानसभेसाठी आघाडीचा काँग्रेसला नवा प्रस्ताव!!

    राष्ट्रवादीच्या भ्रष्टाचाराच्या फाईलींचे कपाट तुम्हीच मोदी साहेबांना उघडायला सांगा; अजितदादा गटाचा पवारांना टोला!!