प्रतिनिधी
मुंबई : शिवसेनेचे दोन उमेदवार संजय राऊत आणि संजय पवार राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज भरत असताना संभाजीराजे छत्रपती यांनी ट्विट करून यामध्ये ट्विस्ट आणला आहे. आपली कटिबद्धता छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांशी आहे आणि बांधिलकी जनतेशी आहे, असे संभाजीराजे यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे. परंतु या ट्विट मधून त्यांनी आपल्या राज्यसभा अपक्ष उमेदवारी बद्दल सस्पेन्स मात्र कायम ठेवला आहे!! Commitment to the thoughts of Chhatrapati Shivaji Maharaj, commitment to the people
संभाजीराजे यांच्या अपक्ष उमेदवारीसाठी पाठिंबा देण्याचे शिवसेनेने नाकारल्यानंतर संभाजी राजे समर्थक संतप्त झाले. त्यांनी आता राज्यसभा नव्हे, तर संपूर्ण राज्य ताब्यात घेणार असे बॅनर सोशल मीडियामध्ये व्हायरल केले. त्यामधून देखील संभाजीराजे यांची सर्व पक्षांपासून बाजूलाच राहण्याची भूमिका अधोरेखित झाली. पण सर्व पक्षांपासून फटकून राहणे राजकीय दृष्ट्या किती योग्य ठरेल??, याचा अंदाज मात्र अद्याप यायचा आहे.
या पार्श्वभूमीवर संभाजीराजे यांनी आज सकाळी ट्विट करून आपल्या भूमिकेबाबत काहीशी स्पष्टता आणि काही सस्पेन्स तयार केला आहे. आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या नजरेतले स्वराज्य घडवायचे आहे. आपल्या विचारांची बांधिलकी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांशी आहे आणि जनतेशी आपली बांधिलकी आहे, असे ट्विट करून त्यांनी स्वतःला राजकीय पक्षांच्या कक्षेबाहेर ठेवले आहे. मात्र त्याच वेळी आपली राज्यसभेचे अपक्ष उमेदवारी कायम राहणार की नाही??, उमेदवारी अर्ज दाखल करणार की नाही??, त्यासाठी मतांची बेगमी कशी करणार??, या प्रश्नांची उत्तरे मात्र अजूनही सस्पेन्स ठेवली आहेत.
शिवसेनेचे उमेदवार संजय राऊत आणि संजय पवार उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. ते आपल्या प्रचाराला सुरुवातही करतील. त्यांच्यासमवेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार असणार आहेत. यानंतर संभाजीराजे नेमकी कोणती भूमिका जाहीर करतील??, याविषयी उत्सुकता वाढणार आहे.
Commitment to the thoughts of Chhatrapati Shivaji Maharaj, commitment to the people
महत्वाच्या बातम्या
- ब्राह्मण संघटना शरद पवारांकडे चर्चेला गेल्याच कशाला??; प्रकाश महाजन यांचा परखड सवाल
- पेट्रोल – डिझेल : रुपया – रूबल दर विनिमय दराच्या नियोजनातून रशियाकडून स्वस्त तेल खरेदीची मोदी सरकारची तयारी
- खंजीर खुपसण्याची भाषा जपून वापरा!!; पवारांच्या भेटीनंतर संजय राऊतांचा मराठा संघटनांना इशारा
- चिंतन फळता फळेना; गळती थांबता थांबेना!!; कपिल सिब्बल काँग्रेस सोडून समाजवादीच्या पाठिंब्यावर राज्यसभेच्या वाटेवर!!