• Download App
    २०२४ पर्यंत पूर्ण होणार येत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे काम ; एमएमआरडीएचा दावा । Coming to be completed by 2024. Work of Babasaheb Ambedkar Memorial; MMRDA claims

    २०२४ पर्यंत पूर्ण होणार येत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे काम ; एमएमआरडीएचा दावा

    तसेच येथे विहार, ध्यानधारणा केंद्र, ग्रंथालय, माहिती केंद्र, सभागृह, वाहनतळ आणि अन्य सुविधांचा उपलब्ध करण्यात येणार आहेत. Coming to be completed by 2024. Work of Babasaheb Ambedkar Memorial; MMRDA claims


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : दादरमधील इंदू मिल येथे १२ एकर जागेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्याची जबाबदारी एमएमआरडीवर म्हणजेच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणावर सोपविण्यात आली आहे. यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ४५० फूट उंच पुतळा उभारण्यात येणार आहे. तसेच येथे विहार, ध्यानधारणा केंद्र, ग्रंथालय, माहिती केंद्र, सभागृह, वाहनतळ आणि अन्य सुविधांचा उपलब्ध करण्यात येणार आहेत.

    एमएमआरडीएने स्मारकाचा आराखडा तयार करून काम सुरू करण्यासाठीची सर्व प्रक्रिया पूर्ण केली. त्यानंतर स्मारकाच्या कामाला सुरुवात करण्यात आली. सध्या या प्रकल्पाचे काम वेगात सुरू असून २०२४ पर्यंत स्मारक पूर्ण करण्याचे उद्दिष्ट एमएमआरडीएने निश्चित केले आहे.



    महानगर आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवास यांनी स्मारकाच्या कामाचा नुकताच आढावा घेतला, तर कामाची गती आणखी वाढविण्याच्या दृष्टीने काही सूचनाही केल्या आहेत.तसेच स्मारकाचे काम २०२४ पर्यंत पूर्ण करण्यात येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

    संपूर्ण खर्च एक हजार कोटी रुपये

    डॉ. आंबेडकर स्मारकाचे काम २०१२-१३मध्ये हाती घेण्यात आले होते. त्यावेळी स्मारकाचा अंदाजित खर्च ४२५ कोटी रुपये होता. विविध कारणांमुळे खर्चात वाढ होत गेली.त्यानंतर स्मारकाचा खर्च २०१७ मध्ये ७०९ कोटी रुपयांवर पोहोचला. दरम्यान आता हा संपूर्ण खर्च थेट एक हजार कोटी रुपयांवर गेला आहे. त्यानुसार नुकतीच एमएमआरडीएने या निधीला मान्यता दिली.

    Coming to be completed by 2024. Work of Babasaheb Ambedkar Memorial; MMRDA claims

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!