विशेष प्रतिनिधी
सातारा : अनिल देशमुख, प्रताप सरनाईक, अनिल परब यासारख्या नेत्यांवर ईडीने कारवाई केल्यानंतर महाराष्ट्रामध्ये या कारवायांवरून राजकारण चांगलेच रंगले आहे. विरोधी पक्षनेते आणि सत्ताधारी पक्ष यांमध्ये आरोप प्रत्यारोप होतात होताना दिसून येत आहेत. केंद्र सरकारकडून या तपास यंत्रणांचा चुकीचा वापर केला जात आहे अशी देखील टीका महाविकास आघाडीच्या बऱ्याच वरिष्ठ नेत्यांनी केली होती.
‘Come, Only if you are going to take action …… ‘ : Udayan Raje Bhosale
या प्रकरणात उदयनराजे भोसले यांनी देखील एक विधान केले होते. उदयनराजे भोसले यांनी ईडीच्या कारवाईवर भाष्य करताना म्हटले होते की, हे म्हणजे असे झाले आहे, एकमेकांचं झाकायचं आणि सोयीप्रमाणे वर काढायचं. अशा शब्दांमध्ये त्यांनी भाजप साहित बाकी सर्व पक्षांवर टीका केली होती. जर का ईडी आपल्याकडे तपासासाठी आली तर आपण सर्व लोकांची यादी देऊ असे देखील ते मागे म्हणाले होते. जसं आपण पेरतो, तसं उगवतं. आमच्यामागे इडी नाही.
उदयनराजे भोसले यांना कोरोनाची लागण, आईला भेटण्यासाठी आले होते अधिवेशन अर्ध्यावर सोडून
नुकताच त्यांनी साताऱ्यामधील प्रसारमाध्यमांशी संवाद साधला होता. यावेळी त्यांनी पुन्हा एक सणसणीत वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की, ईडी ने याव. पण कारवाई करणार असाल तरच या. एकदा कारवाई करायला आल्यानंतर याचा फोन आला, त्याचा फोन आला असे म्हणून कारवाई अर्धवट सोडून जाणार असाल तर अजिबात येऊ नका. आणि येताना सर्व प्रसारमाध्यमांना बरोबर घेऊन या. नाहीतर उगा राजकारण झालं द्वेषापोटी किंवा हे असे झाले तसे झाले ही आरडाओरड करू नका. असे देखील उदयनराजे यांनी यावेळी म्हटले आहे.
यावेळी उदयनराजे यांना या सर्व कारवायांमागे केंद्र शासनाचा आणि भाजपचा हात आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी ते म्हणाले होते की, कोणीही यामागे असू दे.मी सर्वांची यादी द्यायला तयार आहे.
‘Come, Only if you are going to take action …… ‘ : Udayan Raje Bhosale
महत्त्वाच्या बातम्या
- पुणे, बारामती, कोल्हापूर, जयपूरसह ७० ठिकाणी छाप्यांमध्ये सापडलेली बेहिशेबी मालमत्ता १८४ कोटींची!!
- चंद्रकांत पाटलांची मोठी ऑफर ; म्हणाले – राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांना पराभूत करा अन् सोन्याचा मुकुट मिळवा
- जी २३ नेत्यांना सोनिया सुनावत असताना #यह दिल मांगे राहुल #YehDilMangeRahul जोरदार ट्विटरवर ट्रेंड
- नवाब मलिक यांचा पुन्हा एनसीबीवर वार, एकापाठोपाठ ट्विट करत समीर वानखेडेंना घेरले, म्हणाले – फ्लेचर पटेल कोण हे NCBने सांगावं!