• Download App
    आत्मनिर्भर भारतासाठी सहकार क्षेत्र मोलाचे, सहकार विद्यापीठ, महाविद्यालयांची स्थापनाही करणार; अमित शाह यांची पुण्यात घोषणा|co opretive sector is valuable for self-reliant India, Will also establish co-operative universities and colleges; Amit Shah's announcement in Pune

    आत्मनिर्भर भारतासाठी सहकार क्षेत्र मोलाचे, सहकार विद्यापीठ, महाविद्यालयांची स्थापनाही करणार; अमित शाह यांची पुण्यात घोषणा

    वृत्तसंस्था

    पुणे : आत्मनिर्भर भारतासाठी सहकार चळवळ मोलाची भूमिका बजावू शकते. सहकाराचा लाभ देशातील १३० कोटी लोकांपर्यंत पोचविण्याची गरज आहे. त्या दिशेने केंद्र सरकारने पावले टाकून पहिल्यांदा सहकार मंत्रालयाची स्थापना केली. तसेच नवीन सहकार नीतीची घोषणा केली जाणार आहे.co opretive sector is valuable for self-reliant India, Will also establish co-operative universities and colleges; Amit Shah’s announcement in Pune

    भारताला महासत्ता बनविण्यासाठी सहकार क्षेत्रात आमूलाग्र असे बदल घडवून आणण्यासाठी नवीन सहकार नीती, सहकारी विद्यापीठ आणि महाविद्यालये उभारण्याची केंद्र सरकारची योजना असल्याची घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केली.



    वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्थेच्या पदवी प्रदान कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.शाह म्हणाले, मी गृहमंत्री होण्यापूर्वीपासून सहकार क्षेत्राशी माझे नाते जुळले आहे. सहकार चळवळीचा देशाच्या विकासात मोठा वाटा आहे.

    या चळवळीचा आत्मनिर्भर भारत आणि विविध योजनांचा प्रभावी वापर करून सहकार क्षेत्र अधिक मजबूत करण्याची योजना सरकारची आहे. या क्षेत्राचा सर्वच लोकांना फायदा व्हावा, यासाठी सरकारचे प्रयत्न आहे. सहकारी सोसायट्या बळकट करण्याबरोबर त्याचा शेतकऱ्याना अधिकाधिक फायदा कसा मिळेल, याचा विचार केला जाणार आहे.

    भविष्यात भारताला ५ ट्रिलीयन डॉलर इकॉनॉमी बनविण्यासाठी सहकार क्षेत्र मोलाची भर घालू शकतो.लिज्जत पापड, स्वदेशी खत निर्मिती कंपन्या सहकारी तत्त्वावरच कार्यरत आहेत. लिज्जत पापडचा उद्योग हा सर्वथा महिलांनी महिलांसाठी चालविलेला सहकारी उद्योग आहे.

    त्याच प्रमाणे स्वदेशी खतनिर्मिती संस्था सुद्धा सहकारी पद्धतीने सुरु आहे. जगभरात सेंद्रिय शेती उत्पादनांची जगभर मागणी वाढत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी या संधीचे सोने करून घेण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. त्यासाठी सरकार लागेल ती मदत करण्यास तयार आहे.

    तालुका, जिल्हा, राज्य, देश आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर शेतमाल पोचविण्याची साखळी निर्माण केली जाईल. त्यातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्याबरोबर त्यावर आधारित उद्योगांना चालना मिळणार आहे.तालुका ते नाबार्ड अशी बँकिंग साखळी निर्माण करून शेतकऱ्यांना बिविध योजनांचा लाभ मिळवून देण्याची तयारी सरकारने केली आहे, असे ते म्हणाले.

    co opretive sector is valuable for self-reliant India, Will also establish co-operative universities and colleges; Amit Shah’s announcement in Pune

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस