• Download App
    ‘को-जीत’ करणार कोरोनावर मात : मराठमोळ्या लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकरांकडे मोहीमेचे नेतृत्व!CO-JEET launched by armed forces to fight with  COVID-19 in India

    ‘को-जीत’ करणार कोरोनावर मात : मराठमोळ्या लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकरांकडे मोहीमेचे नेतृत्व

    • लेफ्टनंट जनरल कानिटकर या ‘थ्री स्टार जनरल’ बनणाऱ्या सशस्त्र सैन्यातली तिसऱ्या महिला आहेत. कोविड 19 च्या रुग्णांना दिलासा देण्यासाठी त्यांनी आखलेली रणनीती प्रत्यक्षात साकारण्यासाठी आणि त्यांचे परीक्षण करण्यासाठी त्या 24 तास कार्यरत आहेत. 

    • “को-जीतमध्ये ‘को’ चा अर्थ तीन सैन्याच्या सहकाऱ्यांशी संबंधित आहे, जे शेवटी कोविडवर ‘जीत’ (विजय) मिळवतील.” एक संपूर्ण टीम अत्यंत सक्रिय मार्गाने कार्य करतेय, कारण एखाद्या सैनिकाला प्रतिकूल परिस्थितीत लढण्याचे प्रशिक्षण दिले जाते आणि तो कधीच हार मानत नाही, आम्ही फक्त डॉक्टरच नाही तर सैनिकही आहोत.”

      CO-JEET launched by armed forces to fight with  COVID-19 in India


    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : कोरोनावर मात करण्यासाठी संपूर्ण भारत एकवटला आहे . हे  युद्ध  आपल्याला जिंकायचे आहे.आता युद्ध आहे मग मदतीसाठी सशस्त्र दलही पुढे सरसावलंय. वैद्यकीय पायाभूत सुविधा आणि ऑक्सिजन पुरवठा मजबूत करण्याबरोबरच लोकांचे मानसिक स्वास्थ्य राखण्यासाठी सशस्त्र दलानं ‘को-जीत’ नावाची मोहीम सुरू केली आहे .या मोहिमेचे नेतृत्व महाराष्ट्र कन्या  सैन्यदलांतील इंटिग्रेटेड स्टाफच्या उपप्रमुख (वैद्यकीय विभाग) लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर यांच्याकडे सोपविण्यात आले आहे .CO-JEET launched by armed forces to fight with  COVID-19 in India

    देशातील लसीकरणाची मोहीम अधिक वेगाने राबविण्यासाठी तसेच विविध राज्यांना ऑक्सिजनचा पुरवठा तसेच वैद्यकीय मदत देण्यासाठी लष्कराने एक आराखडा तयार केला आहे, अशी माहिती माधुरी  कानिटकर यांनी दिली.

    को-जीत मोहिमेत आर्मी, भारतीय वायुसेना आणि नौदल या तीन सशस्त्र दलांच्या जवानांच्या सहकार्यानं ऑक्सिजन निर्मितीसह पुरवठा करण्याबरोबरच कोविड बेड उपलब्ध करून देणे आणि साथीवर नियंत्रण ठेवण्यास मदत करण्यासारख्या कामांचा समावेश आहे .

    ऑक्सिजनचे रिकामे टँकर विविध राज्यांत लवकर पोहोचविण्यासाठी लष्कर मदत करणार आहे. त्यामुळे या टँकरचा वाहतुकीचा वेळ वाचेल.

    राज्य सरकारशी चर्चा करून पावले उचलणार
    कोरोना रुग्णांवरील उपचार व अन्य वैद्यकीय मदत करण्याकरिता प्रत्येक विभागातील मिलिटरी कमांडर किंवा वरिष्ठ लष्करी अधिकारी राज्य सरकारशी चर्चा करून त्याप्रमाणे पावले उचलतील.

    सशस्त्र दलाच्या जवानांची टीम 24 तास कार्यरत

    भारत कोरोना विषाणूच्या दुसर्‍या लाटेचा सामना करत आहे. आणि बर्‍याच राज्यांमधील रुग्णालयांमध्ये औषधे, ऑक्सिजन आणि बेड्सची कमतरता भासतेय. वरिष्ठ अधिकारी म्हणाल्या की, देशातील इतर आरोग्य कर्मचार्‍यांप्रमाणेच सशस्त्र दलाच्या जवानांची टीम 24 तास कार्यरत आहे. या कोविड संकटात अनेक माजी सैनिकही सैन्य रुग्णालयात येत आहेत. दिल्ली आणि पुण्यासारख्या शहरांमध्ये आमच्याकडे फक्त संरक्षण आणि माजी सैन्य दलासाठी 400 ते 500 रुग्णालये आहेत

    विविध लष्करी रुग्णालयांत कोरोनाबाधित नागरिकांवर उपचारांची सोय करण्यात आली आहे. लष्करी साधनसामग्री ने-आण करण्यासाठी वापरण्यात येणारे रेल्वेचे डबे आता ऑक्सिजनची वाहतूक करण्याकरिता उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तसेच लष्करातील वैद्यकीय कर्मचारीही कोरोनाग्रस्त नागरिकांवर उपचार करणार आहेत.

    ऑक्सिजनसाठी लष्कराचे २०० ट्रक ड्रायव्हर सेवा बजावणार

    ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी लष्करातील २०० ट्रक ड्रायव्हर जवान सेवा बजावणार आहेत. हवाई दलाच्या विमानांनी सिंगापूर, दुबई आदी देशांतून भारतात ऑक्सिजन टँकर आणले आहेत.

    कोरोनाचे संकट दूर करण्यासाठी लष्कराकडून सर्व साहाय्य करण्यात येईल, असे चिफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपीन रावत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नुकतेच एका बैठकीत सांगितले होते.

    CO-JEET launched by armed forces to fight with  COVID-19 in India

     

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य