शरद पवार कार्ड ऍक्टिव्हेट झाल्याचे स्पष्ट होत आहे. संजय राऊत यांनी विधानसभा बरखास्तीच्या दिशेने अशा शब्दात ट्विट केले आहे. याचा अर्थ एकनाथ शिंदे यांनी जो बंडाचा डाव टाकला आहे, त्याला विधानसभा बरखास्तीचा प्रतिडाव खेळून एकनाथ शिंदे यांच्या गटात शिरलेल्या आमदारांना घाबरवण्याचा प्रकार समोर येत आहे. CM’s resignation possible: Eknath Shinde’s rebellion
संजय राऊत यांनी सुमारे 20 मिनिटांपूर्वी विधानसभा बरखास्तीच्या दिशेने अशा आशयाचे ट्विट करून ट्विट केले आहे. याचा अर्थ उघड आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राजीनामा देण्यापूर्वी राज्यपाल महोदयांकडे विधानसभा बरखास्तीची शिफारस करू शकतात. सध्या तरी त्यांच्याकडे अधिकृतरित्या विधानसभेतले बहुमत असल्याने राज्यपालांना मुख्यमंत्र्यांची शिफारस मान्य करावी लागेल, असा उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचा होरा दिसत आहे.
विधानसभा बरखास्त झाले की सर्व आमदारांना मध्यावधी निवडणुकांची भीती घालता येऊ शकेल आणि त्यातून आमदार परत शिवसेनेकडे खेचण्याचा हा डाव आहे.
पण मूळ मुद्दा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देताना विधानसभा बरखास्तीची शिफारस केली तरी राज्यपाल ती मान्य करतील का??, हा सर्वात कळीचा मुद्दा आहे. भले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांच्या सल्ल्याने हा डाव टाकला असेल, पण हा डाव काँग्रेसला मान्य होईल का हा देखील फार कळीचा प्रश्न आहे?? शिवसेनेचे एकनाथ शिंदे गटाकडे गेलेले आमदार खेचण्यासाठी हा पहिला डाव “पवार प्रेरित” शिवसेनेने टाकल्याचे मानले जात आहे. पण या “पवार प्रेरित” डावाला भाजप भुलेल का?? आणि भाजपचे पूर्ण बॅकिंग असलेला एकनाथ शिंदे यांचा गट घाबरेल का? हाही तितकाच महत्त्वाचा प्रश्न आहे.
– पवारांच्या भरवशावर 25 वर्षांच्या सत्तेची भाषा करणारे राऊत आता म्हणाले, सत्ता जाईल पण शिवसेना उभारी घेईल!!
शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांच्या भाषेत आता बराच बदल झाला आहे. शरद पवारांच्या भरवशावर महाविकास आघाडीचे सरकार 25 वर्षे चालेल अशी भाषा करणारे संजय राऊत आता 2.5 वर्षातच शिवसेनेची सत्ता जाईल. पण शिवसेना पुन्हा उभारी घेईल, असे वक्तव्य करताना दिसत आहेत.
शिवसेनेचे वरिष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर आता ठाकरे – पवार सरकारच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. गेल्या दोन दिवसांपासून शिंदेंनी पक्षाविरोधात बंड पुकारले तेव्हापासून राज्यात राजकीय नाट्य घडताना दिसत आहे. अशातच शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी आक्रमक भाषेत मवाळ भूमिका घेतल्याचे दिसते आहे. शिवसेना हा संघर्ष करणारा राजकीय पक्ष आहे. आमच्याकडे राखेतून पुन्हा उभारी घेण्याची क्षमता आहे. सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडींमुळे जास्तीत जास्त काय होईल, सत्ता जाईल. पण सत्ता परत मिळवता येईल. पक्षाची प्रतिष्ठा ही आमच्यासाठी सर्वोच्च आहे, असे बुधवारी माध्यमांशी बोलताना राऊत यांनी म्हटले आहे.
– शिंदेंना पक्ष सोडणे सोपे नाही
आज बुधवारी सकाळी एकनाथ शिंदेंसोबत बोलणे झाल्याचा दावाही त्यांनी केला आहे. आमच्यात तासभर चर्चा झाली. आमचं फोनवर बोलणं झाल्याची कल्पना मी उद्धव ठाकरेंना दिली आहे. पक्षाकडून त्यांच्याशी संवाद सुरू आहे. शिंदे हे शिवसैनिक आहेत. त्यांनी शिवसेनेचे काम केले असून शिंदेंना पक्ष सोडणे सोपे नाही आणि आम्हालाही त्यांना सोडणे सोप नाही, त्यांची नाराजी दूर होईल, सर्व आमदार परत येतील. एकनाथ शिंदेंचे बंड शांत होईल, असा दावाही संजय राऊत यांनी केला आहे.
राखेतून गरूड झेप घेण्याची शिवसेनेची ताकद
पत्याच्या बंगल्याप्रमाणे सरकार कोसळेल असं भाजपला वाटत असेल पण शिवसेनेत राखेतून गरूड झेप घेण्याची ताकद आहे, असे राऊत म्हणाले.
CM’s resignation possible: Eknath Shinde’s rebellion
महत्वाच्या बातम्या
- शिवसेनेला खिंडार : एकनाथ शिंदे बंडखोरी नाट्यातील मुख्य पात्रे आहेत कुठे?? ती तर रंगमंचावर अद्याप आलीच नाहीत!!
- राजकीय भूकंप : एकनाथ शिंदे बंडखोर शिवसेना आमदारांसह गुवाहाटीमध्ये पोहोचले, म्हणाले- मी बाळासाहेबांचा कट्टर समर्थक!
- एकनाथ शिंदे : बाळासाहेबांचे हिंदुत्व पुढे नेणारे, पण चिमणभाई पटेलांचे वारसदार!!; शिवसेनेचे 40 आमदार शिंदे गटाकडे!!
- देशाला मिळणार पहिल्या महिला आदिवासी राष्ट्रपती; द्रौपदी मुर्मू यांना एनडीएची उमेदवारी!!; कोण आहेत त्या??