मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रथमच उद्धव ठाकरे दिल्लीत.
मराठा आरक्षणासह अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील महत्वाच्या नेत्यांचं एक शिष्ठमंडळ आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण आणि पदोन्नतीच्या आरक्षणावरुन चांगलाच गदारोळ सुरु आहे. या बैठकीत मुख्यमंत्री पंतप्रधान नरेंद्र मोदींशी चर्चा करुन केंद्राचं सहकार्य मागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. CM WITH PM : CM UDDHAV THAKREY IN DELHI TO MEET PM NARENDRA MODI
असा असेल नियोजित कार्यक्रम-
- सकाळी ७ – मुख्यमंत्री विमानाने दिल्ली रवाना
- सकाळी ०९. ४५ मिनिट- दिल्लीतील महाराष्ट्र सदन येथे आगमन
- सकाळी ११ – पंतप्रधान मोदी यांच्यासोबत बैठक
- • दुपारी १२ -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाराष्ट्र सदनात पत्रकार परिषद घेऊन नंतर विमानाने मुंबईत परतणार आहेत.
- मुख्यमंत्र्यांसोबत उप-मुख्यमंत्री अजित पवार, अशोक चव्हाण हे नेतेही असणार आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने आपला निकाल देताना मराठा समाज हा मागास नाही असं सांगत आरक्षणाचा निर्णय रद्द केला होता. त्यामुळे आता मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर केंद्रीय मागासवर्ग आयोगाची भूमिका महत्वाची ठरणार आहे.
त्यामुळे या भेटीत उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत याबद्दल चर्चा करण्याची शक्यता आहे. याव्यतिरीक्त ओबीसी आरक्षण, पदोन्नतीमधलं आरक्षण, पीकविमा, कोरोना लसीकरण या विषयांवरही या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
CM WITH PM : CM UDDHAV THAKREY IN DELHI TO MEET PM NARENDRA MODI
महत्त्वाच्या बातम्या
- वयोवृद्ध पत्नीला अमानुष मारहाण ; व्हिडिओ व्हायरल होताच आळंदीला निघून गेलेल्या गजानन बुवा चिकणकरला बेड्या
- M.S.DHONI : महेंद्रसिंग धोनी झाला पुणेकर पुण्याचा या भागामध्ये विकत घेतले घर !
- Pandharpur Wari : किमान 100 वारकऱ्यांसोबत पायी वारीला जाण्याची परवानगी द्यावी ; आळंदी देवस्थानाची मागणी
- लसीचे दोन डोस घेतलेल्यांना लोकलच्या प्रवासासाठी परवानगी देण्याची मागणी