• Download App
    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रुग्णालयात दाखल, छोटीशी शस्त्रक्रिया होणार, सर्व्हायकल आणि पाठदुखीच्या वेदनांनी त्रस्त । cm uddhav Thackeray admitted in hm reliance hospital suffering from cervical and back pain

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रुग्णालयात दाखल, छोटीशी शस्त्रक्रिया होणार, सर्व्हायकल आणि पाठदुखीच्या वेदनांनी त्रस्त

    महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुढील ३ ते ४ दिवस ते रिलायन्स ग्रुपच्या हरकिशनदास रुग्णालयात उपचार घेणार आहेत. काही दिवसांपासून उद्धव ठाकरे यांच्या मानेजवळ दुखत होते. त्यानंतर सोमवारी त्यांची चाचणी झाली. चाचणीत त्यांना मानेजवळील मणक्यामध्ये आणि पाठीत दुखत असल्याचे निदान झाले. आज त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले. रुग्णालयातील डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, एक छोटीशी शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बरे होतील. cm uddhav Thackeray admitted in hm reliance hospital suffering from cervical and back pain


    वृत्तसंस्था

    मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुढील ३ ते ४ दिवस ते रिलायन्स ग्रुपच्या हरकिशनदास रुग्णालयात उपचार घेणार आहेत. काही दिवसांपासून उद्धव ठाकरे यांच्या मानेजवळ दुखत होते. त्यानंतर सोमवारी त्यांची चाचणी झाली. चाचणीत त्यांना मानेजवळील मणक्यामध्ये आणि पाठीत दुखत असल्याचे निदान झाले. आज त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले. रुग्णालयातील डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, एक छोटीशी शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बरे होतील.

    डॉ. शेखर भोजराज त्यांची शस्त्रक्रिया करणार आहेत. आज ज्या एचएन रिलायन्स हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आले आहे त्याच एचएन रिलायन्स हॉस्पिटलमध्ये त्यांच्या प्रकृतीचीही तपासणी करण्यात आली. गेल्या सोमवारी झालेल्या तपासणी आणि चाचणीचा अहवाल पाहिल्यानंतर डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हे दुखणे गेल्या आठवड्यापासून सुरू झाले आहे.

    गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मानेच्या आणि मणक्याच्या त्रासामुळे अनेक कार्यक्रम रद्द केले होते. ते लोकांशी भेटणेही कमी करत होते. दिवाळीच्या दिवशी त्यांच्या वर्षा बंगल्यावर जाणाऱ्यांनाही ते क्वचितच भेटायचे. वेदना वाढत होत्या. त्यामुळे आता शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

    cm uddhav Thackeray admitted in hm reliance hospital suffering from cervical and back pain

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस