विशेष प्रतिनिधी
मुंबई : CM Fadnavis भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याविषयी केलेल्या एका वादग्रस्त विधानाचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटत आहेत. अनेक राजकीय नेत्यांनी या प्रकरणी पडळकरांच्या विधानाचा निषेध केला आहे. स्वतः शरद पवारांनी याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करून आपली नाराजी कळवली. त्यानंतर फडणवीसांनी पडळकरांना फैलावर घेत बोलताना भान राखण्याचा सल्ला दिला. गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या विधानाचे आम्ही केव्हाच समर्थन करणार नाहीत, असे ते म्हणालेत.CM Fadnavis
गोपीचंद पडळकर यांनी सांगलीत एकेठिकाणी बोलताना जयंत पाटील व त्यांच्या कुटुंबीयांविषयी वादग्रस्त विधान केले होते. यासंबंधीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पत्रकारांनी शुक्रवारी याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न केला. त्यावर ते म्हणाले, गोपीचंद पडळकर यांनी जे स्टेटमेंट केले ते योग्य आहे असे माझे मत नाही. कुणाच्याही वडिलांविषयी किंवा परिवाराविषयी असे बोलणे योग्य नाही. यासंदर्भात माझी पडळकरांशी चर्चा झाली. त्यांनाही मी सांगितले. मला शरद पवारांचाही फोन आला होता. त्यांच्याशीही मी संवाद साधला. अशा प्रकारच्या विधानाचे आम्ही कधीच समर्थन करणार नाही.CM Fadnavis
बोलताना भान राखण्याचा सल्ला
गोपीचंद पडळकर एक तरुण नेते आहेत. आक्रमक नेते आहेत. अनेकदा आक्रमकपणा दाखवत असताना आपल्या बोलण्याचा नेमका काय अर्थ निघेल हे ते लक्षात घेत नाहीत. त्यामुळे मी त्यांना सांगितले आहे की, हे लक्षात घेऊनच आपला आक्रमकपणा राखला पाहिजे. तुम्हाला भविष्यात चांगला नेता म्हणून मोठी संधी आहे. त्यामुळे आपण बोलत असताना त्याचे काय अर्थ निघतील हे लक्षात घेऊन आपण बोलले पाहिजे, असा सल्ला मी त्यांना दिला आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. पत्रकारांनी यावेळी मुख्यमंत्र्यांना सरकार तयार करत असलेल्या गोल्डन डेटाविषयी प्रश्न केला. त्यावर ते म्हणाले, गोल्डन डेटावर अजूनही काम सुरू आहे. ते काम पूर्ण झाल्याशिवाय मी त्यावर बोलणार नाही.
आत्ता पाहू काय आहे गोपीचंद पडळकरांचा वाद?
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष तथा आमदार जयंत पाटील व त्यांच्या कुटुंबाविषयी एक वादग्रस्त विधान केले आहे. जयंत पाटील हा एक बिनडोक माणूस आहे. तो दर 8 दिवसांनी आपण किती बिनडोक आहोत हे सिद्ध करतो. एका कंत्राटदाराच्या आत्महत्येच्या प्रकरणात ते मला अडकवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी जतमध्ये काही माणसे पाठवली होती. त्यांच्या मार्फत त्यांनी मी एखाद्या व्यापाऱ्याकडून पैसे घेतलेत का? याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. पण हा गोपीचंद पडळकर जयंत पाटलांसारखा भिकाऱ्याची अवलाद नाही. हा जयंत पाटील राजराम बापू पाटील यांची अवलाद नक्की नसणार. काहीतरी गडबड आहे, असे ते म्हणाले होते.
शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांकडे नोंदवला निषेध
गोपीचंद पडळकर यांच्या या विधानाचे राज्याच्या राजकारणात तीव्र पडसाद उमटलेत. शरद पवारांनी या प्रकरणी थेट मुख्यमंत्री फडणवीस यांना फोन करून पडळकर यांच्या विधानाचा निषेध व्यक्त केला. अशा प्रकारची पातळी सोडून केलेली टीका योग्य नाही. या वक्तव्याचा आम्ही निषेध करतो. बेताल वक्तव्य करणाऱ्यांना आवरा, असे ते फडणवीसांना म्हणाले. त्यामुळे या प्रकरणी मुख्यमंत्री फडणवीस पडळकरांवर नेमकी काय कारवाई करतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
जयंत पाटलांचा भाष्य करण्यास नकार, इस्लामपुरात मोर्चा
राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने शुक्रवारी गोपीचंद पडळकर यांच्या निषेधार्थ इस्लामपूर तहसील कार्यालयावर निषेध मोर्चा काढला. पडळकर यांच्यावर भाजपने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी अनेक पदाधिकाऱ्यांनी पडळकर यांचा चांगलाच समाचार घेतला. या मोर्चाला हजारोंची गर्दी जमली होती. दरम्यान, पडळकर यांच्या विधानाचे राज्यभर पडसाद उमटत असताना जयंत पाटील यांनी मात्र यावर भाष्य करण्यास नकार दिला आहे. मी या प्रकरणी काहीही बोलणार नाही. जे काही चाललंय ते तुम्हीच बघा, असे ते म्हणालेत.
हा महाराष्ट्राच्या परंपरेचा अवमान – सतेज पाटील
काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी पडळकरांचे विधान हे महाराष्ट्राच्या परंपरेचा अवमान असल्याचा आरोप केला आहे. गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर केलेली टीका ही महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकीय परंपरेचा आणि राजारामबापू पाटील कुटुंबाच्या प्रतिष्ठेचा अवमान आहे. पडळकर यांनी वापरलेली असभ्य भाषा ही स्तरहीन आणि समाजातील सभ्यता पायदळी तुडवणारी आहे. भाजपसारख्या राष्ट्रीय पक्षाच्या आमदाराने सार्वजनिक मंचावर अशा शब्दांचा वापर करणे हे महाराष्ट्राच्या परंपरेचा अपमान आहे. याचा तीव्र निषेध करतो, असे ते म्हणालेत.
CM Fadnavis Rebukes Padalkar Controversial Statement
महत्वाच्या बातम्या
- स्टील महाकुंभात महाराष्ट्र पुढच्या पाच वर्षांत ग्रीन स्टील क्षेत्रात प्रथम क्रमांकावर आणायचा निर्धार, ग्रीन स्टील प्रमाणपत्र वाटप
- राहुल गांधींचा मतचोरीचा आरोप दिल्ली विद्यापीठाल्या विद्यार्थ्यांना नाही पटला; बॅलेट पेपरवर झालेल्या निवडणुकीत NSUI ला दिला दणका!!
- Pakistan Saudi Arabia : पाकिस्तान-सौदीमध्ये महत्त्वाचा संरक्षण करार; पाक किंवा सौदीवर हल्ला म्हणजे दोघांवर हल्ला असेल
- Supreme Court : शीख विवाहांची नोंदणी आनंद विवाह कायद्याअंतर्गत करा; सुप्रीम कोर्टाचे UP बिहारसह 17 राज्यांना आदेश