• Download App
    Petrol at ₹450 in Neighboring Countries: CM Fadnavis Urges Caution शेजारील देशांत पेट्रोल 450 रुपये, आपण वेळीच सावध व्हायला हवे; पीएम मोदींच्या आवाहनानंतर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया

    CM Fadnavis : शेजारील देशांत पेट्रोल 450 रुपये, आपण वेळीच सावध व्हायला हवे; पीएम मोदींच्या आवाहनानंतर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया

    CM Fadnavis

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : CM Fadnavis  आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थिती आणि जागतिक स्तरावरील अस्थिरतेचा मोठा फटका आता भारतीय जनजीवनाला बसू लागला आहे. राज्यात एकीकडे पेट्रोल-डिझेलची टंचाई जाणवत असतानाच, दुसरीकडे घरगुती गॅससाठीही नागरिकांना तासनतास रांगेत उभे राहावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हैदराबाद येथील सभेतून देशाला अत्यंत महत्त्वाचे आवाहन केले असून, अर्थव्यवस्थेवरचा ताण कमी करण्यासाठी ‘संयम आणि बचतीचा’ मार्ग स्वीकारण्यास सांगितले आहे. यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी “शेजारील देशांत पेट्रोल 450 रुपये, आपण वेळीच सावध व्हायला हवे. पंतप्रधान मोदींनी जे सांगितलंय ‘ते’ पाळावे,” असे आवाहन केले आहे.CM Fadnavis

    अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्षामुळे जागतिक इंधन पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. भारताकडे स्वतःच्या मोठ्या तेल विहिरी नसल्यामुळे आपल्याला आयातीवर अवलंबून राहावे लागते. पंतप्रधान मोदींनी स्पष्ट केले की, जरी आपण सध्या पुरवठा सुरळीत ठेवला असला, तरी भविष्यातील संकटाची पावले ओळखून आताच बंधने घालणे गरजेचे आहे. यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.CM Fadnavis



    नेमके काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

    पंतप्रधानांच्या या भाषणानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधताना जागतिक परिस्थितीची दाहकता स्पष्ट केली. ते म्हणाले, “अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धामुळे जगात तेल आणि गॅसचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. अनेक देशांमध्ये लॉकडाऊनची परिस्थिती आहे.”

    पाकिस्तानचे उदाहरण देत दिला इशारा

    मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, “आपल्या शेजारील देश असलेल्या पाकिस्तानमध्ये पेट्रोलचे दर ४५० रुपये प्रतिलिटरपर्यंत पोहोचले आहेत. इतकी वाईट अवस्था असूनही पंतप्रधान मोदींनी भारतात पुरवठा साखळी विस्कळीत होऊ दिली नाही. आपल्याला तेल आणि गॅस उपलब्ध होत आहे, याचा अर्थ आपण त्याचा अपव्यय करावा असा होत नाही. जर आपण आताच सावध झालो नाही आणि इंधनाचा नाश थांबवला नाही, तर आपल्यालाही संकटाचा सामना करावा लागेल.”

    नेमके काय म्हणाले होते पंतप्रधान नरेंद्र मोदी?

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी सांगितले की, पेट्रोल, गॅस आणि डिझेलचा वापर आजच कमी केला पाहिजे. शेजारील देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे जगभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती अनेक पटींनी वाढल्या आहेत.

    हैदराबादमधील भाजपच्या सभेत पंतप्रधान म्हणाले, “या जागतिक संकटाचा भारतावर विशेष परिणाम झाला आहे, कारण आपल्याकडे मोठ्या तेल विहिरी नाहीत. आज आपल्याला ‘वर्क फ्रॉम होम’ सारख्या उपायांची गरज आहे. ज्या शहरांमध्ये मेट्रो आहे, तेथील लोकांनी तिचा वापर केला पाहिजे.”

    ते म्हणाले की, पूर्वी युद्धाच्या काळात लोक सोन्याचे दान करत असत. आज दानाची गरज नाही, पण आपण पुढील वर्षभर कोणत्याही कार्यक्रमात सोने न खरेदी करण्याची प्रतिज्ञा घेतली पाहिजे. यामुळे परकीय चलनही वाचेल.

    Petrol at ₹450 in Neighboring Countries: CM Fadnavis Urges Caution

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Ashok Kharat Case : भोंदू अशोक खरात प्रकरणी रूपाली चाकणकरांची एसआयटीकडून 6 तास चौकशी; आर्थिक व्यवहार आणि पूजा-विधींबाबत विचारले प्रश्न

    Nitin Gadkari : नितीन गडकरी म्हणाले- देशात पाण्याची कमतरता नाही, नियोजनाचा अभाव; पॉवर ग्रीडप्रमाणे वॉटर ग्रीडही आवश्यक

    WCD Department : बदली प्रक्रिया आता अधिक पारदर्शक होणार; महिला व बाल विकास विभागाच्या बदल्या आता ऑनलाईन पद्धतीने; कर्मचाऱ्यांत आनंद