• Download App
    CM Fadnavis: Kokate Rummy Video Wrong CM फडणवीस म्हणाले- माणिकराव कोकाटेंचे बोलणे चुकलेच,

    CM Fadnavis : CM फडणवीस म्हणाले- माणिकराव कोकाटेंचे बोलणे चुकलेच, त्यांनी काहीही सांगितले तरी आमच्यासाठी भूषणावह नाही!

    CM Fadnavis

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : CM Fadnavis राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विधानसभेत रमी खेळण्याच्या व्हिडिओवर मुख्यमंत्र्यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली. माणिकराव कोकाटे यांनी त्यावर स्पष्टीकरण दिले आहे. पण त्यांनी काहीही सांगितले असले तरी ते आमच्यासाठी भूषणावह नाही, असे फडणवीस म्हणाले.CM Fadnavis

    मुख्यमंत्री CM Fadnavisम्हणाले की, जे घडले ते अतिशय चुकीचे आहे. विधानभवनामध्ये अशा प्रकारची गंभीर चर्चा सुरू असताना आपले काम नसले तरी आपण गंभीर असणे आवश्यक आहे. साधारणपणे सभागृहात कामकाजाचे कागद वाचता किंवा इतर काही वाचता तर ते ठीक आहे, पण रमी खेळणे हे काही बरोबर नाही.CM Fadnavis



    कोकाटे यांनी त्यावर स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी काहीही सांगितले तरी ते काही आमच्यासाठी भूषणावह नाही. दरम्यान, कोकाटेंवरील कारवाईचा चेंडू राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी अजित पवारांच्या कोर्टात टोलवला आहे. शेतकरी संकटात असताना कृषिमंत्र्यांचे वागणे अयोग्य असल्याचे तटकरेंनी म्हटले आहे.

    CM Fadnavis: Kokate Rummy Video Wrong

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Robert Vadra : गुरुग्राम लँड डीलप्रकरणी रॉबर्ट वाड्रा यांना न्यायालयाची नोटीस; ईडीचे आरोपपत्र; 7.5 कोटींची जमीन 58 कोटींना विकल्याचा आरोप

    लांडगा आला रे आला म्हणून लिबरल लोक शिंदेंच्या हातातून शिवसेना घेताहेत “काढून”!!

    तामिळनाडूचे वारे महाराष्ट्रात आणले; पवारांचे शिलेदार सनातन हिंदू धर्माला शिव्या देऊ लागले!!