• Download App
    CM Fadnavis Maharashtra Trillion Dollar Economy Target Winter Session Photos Videos Report अधिवेशनात मुख्यमंत्री फडणवीसांकडून घोषणा; :2030 पर्यंत राज्याला ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी करण्याचे लक्ष्य

    CM Fadnavis : अधिवेशनात मुख्यमंत्री फडणवीसांकडून घोषणा; :2030 पर्यंत राज्याला ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी करण्याचे लक्ष्य

    CM Fadnavis

    विशेष प्रतिनिधी

    नागपूर : CM Fadnavis नागपूर येथील हिवाळी अधिवेशन नुकतेच पार पडले असून यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणांचा पाऊस पाडल्याचे दिसून आले. या अधिवेशनात शेतकऱ्यांचे अनेक मुद्दे विरोधकांनी उचलून धरले होते. परंतु, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारकडून समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याची टीका विरोधकांनी केली आहे. आता या अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी कोणत्या घोषणा केल्या आहेत तसेच त्यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे पाहुयात.CM Fadnavis

    देवेंद्र फडणवीस म्हणाले, नवीन सरकार आल्यावर एक वर्ष झाले. आम्ही महायुतीमधील तिन्ही नेते एकत्रित निर्णय करतो. अंमलबजावणीचा प्रयत्न सातत्याने करतो. नगरपालिका निवडणुका झाल्या. महापालिका व जिल्हा परिषद होतील. अनेक वर्षे निवडणूक न झाल्याने स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये दु:ख होते. आता लोकशाही खालच्या स्तरापर्यंत पोहोचण्यास महाराष्ट्र गतीने काम करेल. मध्यंतरी महाराष्ट्राला भोगावे लागले. या सगळ्या गोष्टी विसरून जायच्या. कारण महाराष्ट्र आता थांबणार नाही. सकारात्मकतेने पुढे जायचा आमचा विचार आहे. अमृतमहोत्सवी महाराष्ट्र घडवण्यासाठी वाटचाल करायची आहे. सभागृहातील दोन्ही बाजूच्या नेत्यांना आवाहन आहे, महाराष्ट्राला पुढे नेण्याचा विचार करूयात.CM Fadnavis



    कोणतीही योजना बंद होणार नाही

    पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, अनेकांनी योजनांवर शंका घेतली. निवडणूक झाली की योजना बंद करतील बोलले. कुठलीही योजना बंद होणार नाही. पाच वर्षे योजना सुरु राहतील. व्हिजन डॉक्युमेंट महाराष्ट्राच्या विकासाचे तयार केले आहे. 2030, 2035 व 2047 असे तीन टप्पे केले आहे, 2029-30 दरम्यान देशातील पहिली ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी महाराष्ट्र असेल. देशात 3 राज्य आहेत. ज्यांचे दायित्व 20 टक्क्यांपेक्षा कमी आहे, त्यात, गुजरात ओरिसा व महाराष्ट्र आहे. राजकोषीय तूट ही 3 टक्क्यांच्या आत ठेवणे गरजेचे आहे. लाडकी बहीण व शेतकऱ्यांना पैसे देऊन 3 टक्क्यांपर्यंत ठेवण्यात यशस्वी ठरलो आहोत. त्यामुळे आपण दिवाळखोरीकडे चाललो नाही. देशातील इतर राज्याच्या तुलनेत राज्याने भांडवली गुंतवणूक जास्त केलेली आहे. कुठलीही तडजोड आपण केलेली नाही.

    एफडीएमध्ये महाराष्ट्र नंबर वन

    महाराष्ट्रातील गुंतवणुकीविषयी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, महाराष्ट्र हा गुंतवणुकीत पुढे चालला आहे. दावोसमध्ये आपण पाहिले की 15 लाख कोटी रुपयांचे करार होते. त्यातील 5 लाख कोटी ही विदर्भातील होती. कोकणात 2 लाख कोटी गुंतवणूक होती. 2022 ते 25 विचार केला, तर दावोस गुंतवणूक ही 17 लाख कोटींवर जाते सामंजस्य करारापैकी अंमलबजावणी झाली त्याचे प्रमाण 75 टक्के आहे. पहिल्या 2 वर्षांतील 90 टक्क्यांपर्यंत आहे. म्हणजे करार अंमलबजावणी सुरु आहे. 13 लाख 75 हजार कोटींची गुंतवणूक आहे. 7 लाख रोजगार निर्मिती होणार आहे. एफडीए मध्ये महाराष्ट्र नंबर वन आहे.

    सोलर मॉड्युलमध्ये विदर्भ हे देशात एक नंबर होईल

    2025-26 मध्ये 91 हजार कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात आली आहे. देशातील एकूण गुंतवणूक पैकी 31 गुंतवणूक फक्त महाराष्ट्रात आली आहे. विदर्भात गडचिरोली हे नवे मॅग्नेट तयार झाले आहे. सर्वाधिक गुंतवणूक ही गडचिरोलीमध्ये आली आहे. गुंतवणूक केलेल्या कंपनीतील काहींचे उत्पादन सुरु झाले आहे, त्यामुळे सोलर मॉड्युलमध्ये विदर्भ हे देशात एक नंबर होईल, अशा विश्वास देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला.

    ईव्ही कॅपिटल म्हणून मराठवाडा तयार होतोय

    स्टीलमध्ये 2 लाख कोटींची गुंतवणूक आहे. तर 1 लाख रोजगार निर्माण होईल. गोल गॅसिफिकेशनमध्ये देशातील सर्वात मोठी गुंतवणूक म्हणजे 70 हजार कोटींची गुंतवणूक विदर्भात आली आहे. ईव्ही कॅपिटल म्हणून मराठवाडा तयार होत आहे. 50 हजार कोटींची व 30 हजार रोजगार गुंतवणूक आली आहे. टोयोटा, स्कोडा, अशा जगातील सर्वात मोठे ब्रँड मराठवाड्यात आले आहेत. इतर क्षेत्रातही चांगली गुंतवणूक येत आहे. आता पाण्यासोबत सातारा व कोल्हापूर येथेही गुंतवणूक येतेय. मिहान हे देशातील आयटीमधील बिग 6 आहेत, ते सर्व मिहानमध्ये आहेत. प्रत्यक्ष रोजगार हा 1 लाख 25 हजार लोकांना मिळाला असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

    91 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात थेट मदत

    महाराष्ट्रात महाभरती सुरु केली. या 3 वर्षांत 1 लाख 20 हजार सरासरी नोकरी दिल्या. पुढील 2 वर्षांत तेवढ्याच नोकरी देणार आहोत. इतिहासातील सर्वात मोठी भरती असेल. शेतकरी 32 हजार कोटींचे पॅकेज घोषित केले. त्यात 10 हजार कोटी पायाभूत सुविधा तर 2 हजार कोटी मनरेगा योजनेसाठी तर उरलेले थेट मदत देत होतो. 27 हजार विहिरींना दुरुस्तीसाठी 80 कोटी रुपये दिले आहेत. पुढच्या बजेटमध्ये पैसे उपलब्ध करून देऊ हे सुद्धा सांगितले आहे. याबाबत 2 जीआर काढले. एक 10 हजार तर दुसरा 9 हजार कोटींचा होता. 15 हजार कोटी रुपये थेट शेतकरी खात्यात गेले आहेत. 91 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात थेट मदत गेली आहे. तर 91 लाख शेतकऱ्यांना मदतीचे वाटप झाले असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

    तसेच पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, कापूस संदर्भात सीसीआयने उत्पादकतेवर आधारित खरेदी ठरवली. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत होते. तेव्हा उत्पादकता पकडताना पहिल्या 3 जिल्ह्यांची सरासरी उत्पादकता पकडावी. त्यामुळे 2368 किलो प्रति हेक्टर ही खरेदी चालली आहे. कुठल्याही शेतकऱ्यांचा पैसा परत जाणार नाही. विदर्भ व मराठवाडा येथील शेतकऱ्यांसाठी शेतकरी कृषी संजिवनी योजना गेमचेंजर आहे. सर्व अर्जांना मान्यता दिली आहे. सरपंचांना प्रशिक्षण दिले आहे. 5 हजार गावांचे सूक्ष्म नियोजन केले आहे.

    वीज निर्मितीत मेगा पाऊल

    देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात माहिती देताना सांगितले की, महाराष्ट्र 2026 पर्यंत 12 हजार मेगावॅट वीज निर्मितीचे मोठे लक्ष्य गाठत आहे. यामुळे वीज खरेदीमध्ये कंपनीला 10 हजार कोटी रुपयांचा फायदा होणार आहे. या 16 मेगावॅट प्रकल्पांसाठी लागणाऱ्या पर्यावरणाच्या नियमानुसार, सुमारे पावणे तीनशे कोटी झाडांचे मेटीगेशन (पर्यायी वृक्षारोपण) केले आहे, म्हणजे आपण पावणे तीनशे कोटी झाडे लावली असे म्हटले पाहिजे.

    महावितरणने एका महिन्यात 45 हजार कृषी पंप लावून विक्रम केला असून, दिवसा पाणी मिळत असल्याने शेतकरी खूश आहेत. त्यांनी सांगितले की, शेतकरी आता अभिनंदन करत आहेत. महाराष्ट्र आता आशियातील ग्रीड स्थिरता साधणार आहे. 76 हजार मेगावॅटचे पंप स्टोरेज करार झाले असून, नॅशनल ग्रीडला पॉवर दिली जाईल. पुढील सहा महिन्यात 1 लाख मेगावॅटचे 24 बाय 7 चालणारे ग्रीड तयार करण्याचे नियोजन आहे. या प्रयत्नांमुळे, गेल्या 20 वर्षांपासून दरवर्षी 9 टक्क्यांनी वाढणारे वीज दर आता 2 टक्क्यांनी कमी होतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

    शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी आणि दिलासा

    राज्यावर अतिवृष्टीचा ताण आल्याने अर्थव्यवस्था काहीशी अडचणीत असली तरी, शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. मात्र, कर्जमाफीचा फायदा थेट बँकेला होऊ नये, याची काळजी घेतली जाईल. 2017 आणि 2020 मध्ये कर्जमाफी करूनही शेतकरी पुन्हा कर्जमाफी मागत असल्याने, यावर एकदम उपाययोजना येणार नाही, पण काहीतरी करावे लागेल. या दृष्टीने एक समिती काम करत आहे आणि 1 जुलैपर्यंत सर्व घोषणा करण्यात येतील, असे आश्वासन त्यांनी दिले.

    सिंचन अनुशेष पूर्णत्वास

    मुख्यमंत्र्यांनी सिंचन अनुशेषाबद्दल महत्त्वाची माहिती दिली. राज्यात फक्त 49 हजार एकरचा अनुशेष राहिला आहे, ज्यात अकोला, हिंगोली, बुलढाणा हे तीनच जिल्हे शिल्लक आहेत. अकोल्यात 14 हजार ऐवजी 19 हजार एवढी सिंचन क्षमता होईल, तर बुलढाण्यात 29 हजार हेक्टर अनुशेष असून, चार प्रकल्पात 1 लाख 68 हजारची सिंचन क्षमता तयार होत आहे. यामुळे बुलढाणा जिल्हा अनुशेषातून अधिशेषात जाणार आहे. विदर्भात 485 प्रकल्प पूर्ण झाले आहेत, तर केवळ 74 प्रकल्प बांधकामाधीन आहेत. गोसी खुर्दची सर्व कामे पूर्ण केली असून, जून 2027 पर्यंत 2 लाख 54 हजार हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होईल. सिंचन क्षेत्रात केलेल्या कामाबद्दल केंद्र सरकारने राज्याला ‘सिंचनातील सर्वोच्च’ पुरस्कार दिला असल्याचे त्यांनी सांगितले.

    पुरामुळे दरवर्षी वाहून जाणारे 100 टीएमसी पाणी आता अडवून त्यातील 30 टीएमसी पाणी उजनीमध्ये आणले जाईल, जे पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी गावे व मराठवाड्यातील गावांना दिले जाईल. हे प्रकल्प झाल्यावर महाराष्ट्रातून दुष्काळ भूतकाळ होईल. तसेच, वैधानिक विकास मंडळ पुन्हा जीवंत करून निधी वाटपात विदर्भ व मराठवाड्यावर अन्याय होऊ दिला जाणार नाही, असे आश्वासन त्यांनी दिले.

    लातूर-मुंबई चार तासात

    राज्यात पायाभूत सुविधांचा मोठा विस्तार होत आहे. नागपूर-गोंदिया द्रुतगती महामार्ग हा समृद्धी महामार्गाचा विस्तार असून, यामुळे एका बाजूने ‘नाना पटोले’ तर दुसऱ्या बाजूने ‘प्रफुल्ल पटेल’ जातील, असा चिमटाही त्यांनी काढला. नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्ग मराठवाड्यालाही जोडणार असून, यामुळे 32 जिल्ह्यांना कनेक्टिव्हिटी मिळणार आहे.

    सर्वात महत्त्वाचे म्हणजे, लातूर ते मुंबई हे अंतर आता केवळ साडेचार तासांचे होणार आहे. अभिमन्यू पवार यांनी मागणी केल्यामुळे हा 450 किमी लांबीचा 36 हजार कोटींचा महामार्ग दिला आहे. हा मार्ग ठाणे, पुणे, बीड, अहिल्यानगर व लातूर यांना जोडेल. बदलापूरजवळ टनेल केल्यामुळे अवघ्या 15 मिनिटांत अटल सेतूवर पोहोचता येईल आणि 20 मिनिटांत मुंबई गाठता येईल, तसेच पुढे वाढवण बंदर व नवी मुंबई विमानतळही गाठता येईल.

    CM Fadnavis Maharashtra Trillion Dollar Economy Target Winter Session Photos Videos Report

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Raj Thackeray : राज ठाकरे सोबत आल्यास उद्धव ठाकरेंचेच नुकसान; रामदास आठवलेंचा दावा, प्रकाश आंबेडकरांच्या दाव्यावरही प्रश्नचिन्ह

    Eknath Shinde : एकनाथ शिंदेंचा नाव न घेता उद्धव ठाकरेंना टोला- मुंबईची तिजोरी लुटणारे ‘रहमान डकैत’, आम्ही त्यांना पाणी पाजणारे धुरंधर

    ‘समृद्धी’, ‘शक्तिपीठ’ महामार्गांनंतर महाराष्ट्रात तिसऱ्या द्रुतगती महामार्गाचे नियोजन; मुख्यमंत्र्यांचा अनुकूल कौल