विशेष प्रतिनिधी
मुंबई : Fadnavis शिवसेना ठाकरे गटाचे नेते व विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा बुधवारी निरोप समारंभ पार पडला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दानवे यांचे कौतुक करत टोलेबाजी देखील केली. यावेळी सभागृहात उद्धव ठाकरे देखील उपस्थित होते. यावेळी फडणवीस यांनी त्यांना थेट सत्तेत येण्याची ऑफर दिली होती. तिकडे स्कोप नाही पण इकडे आहे, तुम्ही येऊ शकता, असे देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंना उद्देशून म्हटले.Fadnavis
देवेंद्र फडणवीस ( Fadnavis ) यांनी दिलेल्या या ऑफरनंतर दुसऱ्या दिवशी फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात बैठक देखील झाली. या बैठकीला आदित्य ठाकरे देखील उपस्थित होते. या बैठकीची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. या बैठकीत हिंदी भाषा सक्ती, त्रिभाषा सूत्र आणि विरोधी पक्षनेते पदावर चर्चा झाली. विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या दालनात ही बैठक झाली. या बैठकीवर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.Fadnavis
देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीवर प्रतिक्रिया देताना म्हटले, हिंदी सक्ती हवीच कशाला या लेखाचा संग्रह प्राप्त झाला. ठाकरेंनी काल दिलेले पुस्तक मी वाचले. कोणी कोणाला भेटले म्हणजे युतीसाठी भेटले असे होत नाही, असे स्पष्टीकरण देखील फडणवीसांनी दिले. तसेच पहिली ते बारावी हिंदी सक्तीचा अहवाल ठाकरेंच्या कॅबिनेटसमोर आला होता आणि ठाकरेंच्या कॅबिनेटने अहवाल स्वीकारला होता, असा दावाही फडणवीस यांनी केला.
दरम्यान, सध्या महाराष्ट्रात भाषेचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. मराठी भाषेसाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र देखील आले. 5 जुलै रोजी त्यांनी विजयी मेळावा देखील घेतला. ही जवळीक मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर असल्याचे सत्ताधाऱ्यांकडून बोलले जात आहे.
Fadnavis Clarifies Meeting with Uddhav Thackeray: Not for Alliance
महत्वाच्या बातम्या
- बरोबरच आहे राज ठाकरेंच्या भाषणाची स्क्रिप्ट फडणवीस कशाला लिहून देतील??, पण…
- India-UK : भारत-ब्रिटनमध्ये FAT वर स्वाक्षरीची शक्यता; ब्रिटनच्या आलिशान गाड्या आणि ब्रँडेड कपडे स्वस्त होणार
- Robert Vadra : गुरुग्राम लँड डीलमध्ये रॉबर्ट वाड्रा यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल; पहिल्यांदाच ईडीने औपचारिक आरोपी बनवले
- पडळकरांच्या मुद्द्यावरून पत्रकारांनी फडणवीसांना छेडले; पण अजितदादांना शेजारी बसवून फडणवीसांनी आव्हाडांचेही वाभाडे काढले!!