• Download App
    Devendra Fadnavis जलवाहतुकीत क्रांती; मुंबईत वॉटर मेट्रो प्रकल्पाला वेग; 11 नवीन जलमार्ग, 24 नवीन टर्मिनल्स आणि 340 किलोमीटर प्रवास

    जलवाहतुकीत क्रांती; मुंबईत वॉटर मेट्रो प्रकल्पाला वेग; 11 नवीन जलमार्ग, 24 नवीन टर्मिनल्स आणि 340 किलोमीटर प्रवास

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली जलवाहतूक संदर्भात आढावा बैठक पार पडली. मुंबई महानगर प्रदेशात जल प्रवासी वाहतुकीसाठी वॉटर मेट्रो प्रकल्प तीन टप्प्यात कार्यान्वित करण्यात येणार असून यादृष्टीने शिपयार्ड विकसित करण्यासाठी जागा निश्चित केली जावी, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले. यातून जलप्रवासी वाहतुकीसाठी आवश्यक बोटींची बांधणी होऊ शकेल, असेही मुख्यमंत्री म्हणाले. Devendra Fadnavis

    या बैठकीत जलमार्ग, विविध बंदरांचा विकास, सागरी प्रवासी वाहतूक प्रकल्प यांची सविस्तर माहिती सादर करण्यात आली. तसेच नांदगाव, दिघी, विजयदुर्ग येथे शिपयार्ड विकसित करणे, मुंबई महानगर क्षेत्रात जलमार्ग कार्यान्वित करणे, ग्रीन फील्ड शिप बिल्डिंग क्लस्टर विकसित करण्याबाबत सादरीकरण करण्यात आले.

    मुंबई वॉटर मेट्रोची वैशिष्ट्ये:

    •  11 नवीन जलमार्ग – 24 नवीन टर्मिनल्स- 215 किलोमीटर
    •  जलमार्ग/टर्मिनल्सचे आधुनिकीकरण – 21 मार्ग, 20 टर्मिनल्स- 125 किलोमीटर
    •  एमएमआर प्रदेशातील एकूण जलमार्गांची लांबी- 340 किलोमीटर
    •  सन 2031 पर्यंत वार्षिक 7.5 कोटी जल प्रवासी संख्या .
    •  नागरी, नौकानयन आणि आपत्कालीन पायाभूत सुविधा – ₹3436 कोटी सागरी पायाभूत सुविधा
    •  इलेक्ट्रिक/हायब्रिड जहाजे (बोटी) संख्या – 207 – खासगी ऑपरेटर- ₹3156 कोटी

    जलप्रवासी वाहतुकीसाठी वॉटर मेट्रो प्रकल्पः

    •  सुलभ, शाश्वत आणि परवडणाऱ्या जलप्रवासी वाहतुकीसाठी सार्वजनिक – खासगी भागीदारी (PPP) मॉडेलची अंमलबजावणी
    • मुंबई महानगर प्रदेशात तीन टप्प्यात कार्यान्वित होणारा हा वॉटर मेट्रो प्रकल्प जगातील जलप्रवासी वाहतुकीतील एक मोठा प्रकल्प ठरेल.
    •  पहिल्या टप्प्यात ₹1500 कोटी निधी खर्च होईल.

    केंद्र सरकारच्या बिल्डिंग क्लस्टर धोरणास अनुसरून शिपयार्ड विकसित करण्यासाठी महाराष्ट्र सागरी मंडळांने सामंजस्य करार केला आहे. याचबरोबर जहाजबांधणी क्षेत्रातील सार्वजनिक व खासगी नामांकित उद्योगांना सहभागी करून घेतले जाणार आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

    यावेळी मंत्री नितेश राणे आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

    CM Devendra Fadnavis chaired a review meeting regarding Water Transport.

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    CM Fadnavis : ड्रग्जविरोधात ‘झिरो टॉलरन्स’ धोरण राबवणार; सहभागी गुन्हेगारांची संपत्तीही जप्त करणार, देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत घोषणा

    LPG Supply : 8 ते 10 दिवसांत गॅस पुरवठा सुरळीत; पंपांवर 61 रुपये लिटरने केरोसिन वाटप, व्यावसायिक सिलिंडर पुरवठ्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना

    एसटी महामंडळात लवकरच 17742 पदांची कंत्राटी भरती; नव्या 8300 बस देखील लवकरच एसटी महामंडळाच्या ताफ्यात!!