- त्रिपुरा राज्यात मुस्लीम समाजावर होणाऱ्या अत्याचारांच्या निषेधार्थ आयोजित मोर्चाला राज्यात काही ठिकाणी हिंसक वळण लागले आहे. Citizens should not believe any rumors, should exercise restraint; Home Minister’s heartfelt appeal
विशेष प्रतिनिधी
मुंबई : त्रिपुरा राज्यात मुस्लीम समाजावर होणाऱ्या अत्याचारांचे पडसाद राज्यात उमटले. दरम्यान राज्यात ठिकठिकाणी निषेधार्थ मोर्चे काढण्यात आले होते. “कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका,अफवा पसरवूही नका.राज्य सरकार परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे, राज्याच्या जनतेनं शांतता व संयम राखावा,” असं आवाहन राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केलं आहे
त्रिपुरा राज्यात मुस्लीम समाजावर होणाऱ्या अत्याचारांच्या निषेधार्थ आयोजित मोर्चाला राज्यात काही ठिकाणी हिंसक वळण लागले आहे. सध्या या भागांमधील परिस्थिती नियंत्रणात असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही यासाठी पोलीस प्रशासनाने दक्ष राहावे, तसेच पोलिसांनी परिस्थिती संयमाने हाताळण्याचे आणि राज्यामध्ये शांतता कशी राहील यादृष्टीने कार्यरत राहण्याच्या सूचनाही गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पोलीस महासंचालकांना दिले आहेत.
या प्रकरणामध्ये जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल.तसेच या परिस्थितीत आपण सगळ्यांनी सामाजिक ऐक्य राखणे आवश्यक आहे आणि त्या दृष्टीकोनातून सगळ्यांनी सहकार्य करावे, अशी विनंतीही वळसे पाटील यांनी जनतेला केली आहे.
Citizens should not believe any rumors, should exercise restraint; Home Minister’s heartfelt appeal
महत्त्वाच्या बातम्या
- उत्तर प्रदेशात भाजपाच सत्ता राखणार, सुधारलेल्या कायदा व सुव्यवस्थेमुळेच यश, योगी आदित्यनाथांच मुख्यमंत्रीपदासाठी सर्वाधिक पसंती
- गोवा, मणिपूरमध्ये भाजपच मारणार बाजी, कॉँग्रेसपेक्षा आपला जादा पसंती
- पंजाबमध्ये कॉँग्रेसला पराभवाचा धक्का बसणार, आप मारणार विधानसभा निवडणुकीत बाजी
- सध्याच्या राजकारणात पोरखेळ, राज्यात बिग बॉसचा शो सुरू, पंकजा मुंडे यांची टीका
- एनसीबीचे उपमहासंचालक म्हणाले यंत्रणा स्वच्छ करायचीय, समीर वानखेडे यांनाही चौकशीसाठी बोलावले जाऊ शकते