• Download App
    पुण्यामध्ये नागरिकांच्या लसीसाठी चकरा ; रुग्णालय वैतागले; चक्क बोर्डावर महापालिका अधिकाऱ्यांचे फोन नंबर केले जाहीर|citizen vaccination in Pune problem

    पुण्यामध्ये नागरिकांच्या लसीसाठी चकरा ; रुग्णालय वैतागले; चक्क बोर्डावर महापालिका अधिकाऱ्यांचे फोन नंबर केले जाहीर

    वृत्तसंस्था

    पुणे : पुण्यामध्ये लस मिळेना म्हणून एका रुग्णालयाने चक्क महापालिकेच्या डॅाक्टर अधिकाऱ्यांचे फोन नंबर जाहीर केले. त्या नंबरवर 200 फोन आल्यामुळे महापालिकेचे अधिकारी प्रचंड वैतागले आहेत. त्यांनी रुग्णालयाविरोधात अखेर तक्रार दाखल केली. citizen vaccination in Pune problem

    पुण्यामध्ये लसी उपलब्ध होत नसल्याने अनेक रुग्णालयात लसीकरण बंद आहे. नागरिक मात्र रुग्णालयांमध्ये चकरा मारत आहेत. त्यामुळे वैतागून अखेर पुण्यातल्या एका खासगी रुग्णालयाने चक्क अधिकऱ्यांचेच फोन नंबर जाहीर केले. कोथरुड मधल्या या रुग्णालयात “ या केंद्रावर लस नाही.



     

    सरकार, महापालिकेडून लस मिळत नसल्याने लसीकरण बंद आहे. अधिक चौकशीसाठी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधा “असा बोर्ड लावला होता. या बोर्डवर या संबंधित अधिकाऱ्यांची नावे आणि फोन नंबर जाहीर केले होते. या अधिकाऱ्यांना लासीसाठी फोन यायला सुरुवात झाली.

    वैतागलेल्या अधिकाऱ्यांनी शोध घेतला.तेव्हा या बोर्डमुळे हे फोन येत असल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी रुग्णालयाशी संपर्क साधून चौकशी केली. दरम्यान वरिष्ठांकडे कारवाईची मागणी केली. संबंधित रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यांना असे करू नये, असे समजावले आहे. दरम्यान, अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक तसेही जाहीर केलेले असतातच.

    – रुबल अग्रवाल, अतिरिक्त आयुक्त, पुणे महापालिका

    citizen vaccination in Pune problem

    Related posts

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा

    Tata Cancer Hospital : मुंबईतील टाटा कॅन्सर हॉस्पिटलला धमकीचा मेल, पोलिसांनी तपास सुरू केला

    CM Fadnvis : सायबर गुन्हे घडण्यापूर्वीच रोखण्यासाठी जनजागृती आवश्यक – मुख्यमंत्री फडणवीस