• Download App
    Chitra Wagh किती ही जळजळ..? 'लाडकी बहिण' वरून चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळे यांना टोला

    Chitra Wagh answer to Supriya Sule : किती ही जळजळ..? ‘लाडकी बहिण’ वरून चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळे यांना टोला

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई: लाडकी बहिण योजनेचा पुण्यात शुभारंभ होत असताना भारतीय जनता पक्ष महिला आघाडीच्या अध्यक्ष चित्रा वाघ आणि शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यात जुंपली आहे. किती ही जळजळ असा टोला वाघ यांनी सुळे यांना लगावला आहे. Chitra Wagh answer to Supriya Sule

    सुळे यांनी एक्स या सोशल नेटवर्किंग साइटवर एक पोस्ट करून लाडकी बहिण योजेनेबाबत आरोप केला आहे. त्यांनी व्हॉट्स ॲपवर आलेल्या एका मेसेजचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. त्यात म्हटले आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना लाभाची रक्कम अदा करणाच्या अनुषंगाने शनिवारी दिनांक 17 ऑगस्ट 2024 रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल बालेवाडी स्टेडियम पुणे येथे राज्यस्तरीय शुभारंभाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे.


    Ramgiri Maharaj : मुस्लिम धर्माबद्दल आक्षेपार्ह वक्तव्यनंतर रामगिरी महाराजांविरोधात 5 गुन्हे दाखल; संभाजीनगर-नगरमध्ये जमाव आक्रमक


    तरी ज्या महिलांनी हा फॉर्म भरला आहे व त्याचे approved मेसेज आला आहे त्यांनी या कार्यक्रमाला हजर राहावे यासाठी पुणे महानगरपालिकेने अहिल्याबाई होळकर बचत गट हॉल, सुखसागर पोलीस चौकी येथून निघण्यासाठी बसची व्यवस्था केलेली आहे. तसेच अल्पोपहाराची पण व्यवस्था केलेली आहे या कार्यक्रमाला हजर राहण्यासाठी नाव नोंदणी आवश्यक आहे सर्वांनी येणे आवश्यक आहे ज्या महिला येणार नाहीत त्यांचा फॉर्म रद्द होईल सुळे यांनी म्हटले आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या रक्कम अदा करण्याच्या कार्यक्रमाला हजर न राहणाऱ्या बहिणींचे फॉर्म रद्द करण्याचे धमकी देणारे हे स्वतःला ‘भाऊ’ म्हणवितात आहेत. बहिणीला कार्यक्रमाला बोलाविणार आणि त्यांची गर्दी दाखवून स्वतःची पाठ थोपटून घेणार…

    अरे सत्तेत बसलेल्या भावांनो, ‘बहिण-भावाचं’ नातं एवढं स्वस्त नसतं. बहिणींना प्रेमानं काही मागितलं तर बहिण त्याला नाही म्हणत नाही. पण तिला धमक्या देऊ लागलात तर ती कुणालाच घाबरत नाही हे लक्षात ठेवा. हिंमत असेल तर या कार्यक्रमाला न जाणाऱ्या एकातरी बहिणीचा फॉर्म रद्द करुन दाखवाच, असा इशारा सुळे यांनी दिला.

    यावर सुळे यांना उत्तर देताना चित्रा वाघ यांनी म्हटले आहे की, ओ बारामतीच्या मोठ्ठ्या ताई….110 कोटींची वांगी जशा फक्त तुम्हीच पिकवू शकता तेव्हा असे खोटे स्क्रीनशॉट तयार करण्यात तुमचा हात कोण पकडेल..?
    आमच्या बहिणींना 18,000 रुपये वर्षाला मिळणार, याचा इतका राग का करताय..? की पैसा कुठून का मिळेना,फक्त एकाच ताईला मिळाला पाहिजे,अन्य कुणाला नाही असे तुम्हाला वाटते…? किती ही जळजळ..?

    Chitra Wagh answer to Supriya Sule

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Devendra Fadnavis : सहकाराच्या सक्षमीकरणासाठी कायद्यात बदल आवश्यक – देवेंद्र फडणवीस

    state government : संरक्षण दल अन् राज्य सरकार यांच्यात महत्त्वपूर्ण समन्वय बैठक

    Devendra Fadnavis : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यामुळे भारतीय स्वातंत्र्यलढ्याला कलाटणी मिळाली – देवेंद्र फडणवीस