प्रतिनिधी
मुंबई : होतकरू तरूणांचा राज्याच्या प्रशासनाशी सुसंवाद वाढावा, विकासाच्या संकल्पना, अभिनव उपक्रम राबवण्यात त्यांचा सहभाग घेता येईल यासाठी यापूर्वी राबविण्यात आलेला मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम २०२३-२४ पासून पुन्हा सुरू करण्याचा निर्णय शिंदे फडणवीस सरकारने घेतला आहे. Chief Minister’s Fellowship resumes in Maharashtra
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या मंत्रालयात आयोजित बैठकीत मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात आले. यापूर्वी राबविलेला मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम पुन्हा सुरू करताना आणखी नवसंकल्पनांचा समावेश करण्यात यावा. हा कार्यक्रम लवकरात लवकर सुरू करण्याचे नियोजन करण्यात यावे. यामध्ये राज्यातील उच्चशिक्षण-संशोधनात कार्यरत संस्थांचाही सहभाग घेण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या.
मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमामुळे उच्चशिक्षित आणि विविध क्षेत्रातील तज्ज्ञ तरूणांना नाविण्यपूर्ण संकल्पना घेऊन शासनासोबत काम करण्याची संधी मिळणार आहे. मुख्यमंत्री फेलोशिपच्या अंमलबजावणीबाबत लवकरच सविस्तर कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे.
मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमात तरूण उत्साहाने सहभागी होतात. त्यांच्या उत्साहातून अनेक विकास संकल्पना गतीमान करता येतात. या योजनांमध्ये लोकाभिमुखता आणि आधुनिकता यांचा मेळ साधला जातो, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
Chief Minister’s Fellowship resumes in Maharashtra
महत्वाच्या बातम्या