• Download App
    मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना मान आणि पाठदुखीचा त्रास, डॉक्टरांचा शस्त्रक्रियेचा सल्ला|Chief Minister Uddhav Thackeray suffers from neck and back pain, doctor advises surgery

    मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना मान आणि पाठदुखीचा त्रास, डॉक्टरांचा शस्त्रक्रियेचा सल्ला

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मान आणि पाठदुखीचा त्रास होत आहे. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना शस्त्रक्रियेचा सल्ला दिला आहे. सध्या उध्दव ठाकरे यांच्यावर घरगुती उपचार सुरू आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी गेल्या काही दिवसांपासून गाठीभेटी कमी केल्या आहेत.Chief Minister Uddhav Thackeray suffers from neck and back pain, doctor advises surgery

    मुख्यमंत्र्यांचा मान आणि पाठीचा विकार मागील काही दिवसांपासून बळावला आहे. हा त्रास अधिक वाढू नये यासाठी एचएन रिलायन्स रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांनी त्यांना लहान शस्त्रक्रियेचा पर्याय सुचवला आहे. मात्र, शस्त्रक्रिया करायची की नाही, याचा निर्णय स्वत: ठाकरे घेणार आहेत. सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर घरगुती उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा देखील आहे.



    गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्र्यांना हा त्रास जाणवत असून, त्यांनी भेटीगाठीही टाळल्या आहेत. सोमवारी पंढरपूरमधील पालखी मार्गाच्या चौपदरीकरणाच्या भूमिपूजन कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांनी आभासी स्वरूपात हजेरी लावली होती. या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या मानेला पट्टा लावलेला होता.

    त्यामुळे अनेकांनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. पाठदुखी आणि मानेच्या स्नायूंच्या दुखापतीचा त्रास होत असल्यामुळे काही वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांना पाठदुखी आणि मानेचा स्नायूच्या दुखापतीमुळे पट्टा लावण्यात आला असल्याचे सांगण्यात आले.

    Chief Minister Uddhav Thackeray suffers from neck and back pain, doctor advises surgery

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!