पंतप्रधानन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘पीएम किसान’ योजनेच्या चौदाव्या हप्त्याचे वितरण करण्यात आले.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : राजस्थानच्या सीकर येथे आज पंतप्रधानन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम किसान योजनेच्या चौदाव्या हप्त्याचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘वर्षा’ निवासस्थानी उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधला. Chief Minister Shinde interacted with farmers assured that the government is with him
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या १४ व्या हप्त्याचा राज्यातील ८५.६६ लाख पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळाला असून, सुमारे १८६६ कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा झाल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. याप्रसंगी कृषिमंत्री धनंजय मुंडे, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री दादाजी भुसे, अपर मुख्य सचिव अनुपकुमार आणि ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यातील शेतकरी उपस्थित होते.h
“राज्यात पावसाला चांगली सुरूवात झाली आहे… पेरणी झाली का? नागली घेता का? भात लावणीसाठी यंत्राची मदत घ्या, कमी वेळेत जास्त काम होईल, शिवाय मनुष्यबळही कमी लागेल…नागली, वरईसह आणि वेगवेगळ्या पिकांची लागवड करा, यातून उत्पन्न वाढण्यास मदत होईल” असे सांगतानाच राज्य शासन आपल्या पाठीशी असल्याची ग्वाही मुख्यमंत्री शिंदे यांनी शेतकऱ्यांना दिली.
Chief Minister Shinde interacted with farmers assured that the government is with him
महत्वाच्या बातम्या
- आप नेते सत्येंद्र जैन यांना अंतरिम जामीन मंजूर, मनी लाँड्रिंगचे गंभीर आरोप
- गडकरी म्हणाले- मतदार हा हुशार आहे, लोभी नाही; घरोघरी मटण वाटले, तरीही आम्ही निवडणूक हरलो
- मणिपूरवर चर्चा न झाल्याने जया बच्चन संतापल्या, नेत्यांनी चर्चा न करणे लाजिरवाणे असल्याची टीका
- पोस्टरवरच्या मुख्यमंत्र्यांच्या पंखांना छाट; हा तर खरा थोरल्यांनाच भाजप श्रेष्ठींनी लावलेला चाप!! घेतला भाजप कार्यकर्त्यांचा क्लास!!