• Download App
    बस अपघाताबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून तीव्र दुःख व्यक्त, मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत; जखमींवर शासकीय खर्चाने उपचार|Chief Minister Eknath Shinde expresses deep grief over bus accident, 5 lakh aid to kin of deceased; Treatment of the injured at government expense

    बस अपघाताबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून तीव्र दुःख व्यक्त, मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत; जखमींवर शासकीय खर्चाने उपचार

    प्रतिनिधी

    मुंबई : जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर खाजगी बस दरीत कोसळून आज पहाटे झालेल्या भीषण अपघाताबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.Chief Minister Eknath Shinde expresses deep grief over bus accident, 5 lakh aid to kin of deceased; Treatment of the injured at government expense

    या अपघातातील मृत आणि त्यांच्या कुटुंबिंयाप्रति सहवेदना प्रकट करुन या दुर्दॅवी घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री शिंदे यांनी जाहीर केली आहे.



    अपघाताची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रायगडचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षकांशी दूरध्वनीवर संपर्क साधून या घटनेची माहिती घेतली. अपघातग्रस्तांना तातडीने मदत करण्याच्या सूचना देतानाच जखमींना शासकीय खर्चाने तत्काळ वैद्यकीय उपचार पुरविण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

    अपघातानंतर तातडीने मदतकार्यात सहभागी झालेल्या हायकर्स आणि आयआरबी टीममधील तरुणांशी मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली, या संकटसमयी मदतकार्यात तातडीने धावून आल्याबद्दल या टीमच्या सदस्यांचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले.

    कसा झाला अपघात?

    जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर खासगी बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात 12 जणांचा मृत्यू झाला असून 25 हून अधिक जण जखमी झाले. मिळालेल्या माहितीनुसार, बोरघाटातील शिंगरोबा मंदिराजवळ पहाटे चारच्या सुमारास जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर खाजगी बस दरीत कोसळली. ही बस पुण्याहून मुंबईच्या दिशेने येत होती. या भीषण अपघातात 12 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. जखमी प्रवाशांना खोपोली नगरपालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

    एमजीएम हॉस्पिटल येथे पाठवण्यात आलेल्या जखमींची नावे

    1)आशिष विजय गुरव,19 वर्षे, दहिसर मुंबई.
    2) यश अनंत सकपाळ, वय 17 वर्ष, गोरेगाव, मुंबई. 3) जयेश तुकाराम नरळकर, वय 24 वर्षे, कांदिवली, मुंबई.
    4) वृषभ रवींद्र कोरमे, वय 14 वर्षे, गोरेगाव, मुंबई.
    5) रुचिका सुनील डुमणे, वय 17 वर्षे, गोरेगाव, मुंबई.
    6) आशिष विजय गुरव, वय १९ वर्ष, दहिसर, मुंबई 7)ओंकार जितेंद्र पवार, वय 25 वर्षे खोपोली, रायगड.
    8) संकेत चौधरी, वय 40 वर्ष,गोरेगाव, मुंबई. 9)रोशन शेलार, वय 35 वर्ष, मुंबई 10)विशाल अशोक विश्वकर्मा, वय 23 वर्ष, गोरेगाव, मुंबई
    11) निखिल संजय पारकर, वय 18 वर्ष, मुंबई.
    12) युसुफ मुनीर खान, वय 13 वर्ष, मुंबई
    13) कोमल बाळकृष्ण चिले, वय 15 वर्ष, सांताक्रुज, मुंबई
    14) अभिजीत दत्तात्रेय जोशी वय 20 वर्षे, गोरेगाव मुंबई.
    16) मोहक दिलीप सालप, वय 18 वर्षे, मुंबई.
    17) दिपक विश्वकर्मा, वय २०वर्ष, गोरेगाव, मुंबई
    18) सुरेश बाळाराम अरोमुक्कंम, वय १८ वर्ष, गोरेगाव,मुंबई.

    खोपोली नगरपालिका हॉस्पिटलमधील जखमींची नावे

    १) नम्रत रघुनाथ गावनुक, वय १८ वर्ष, गोरेगाव, मुंबई.
    २) चंद्रकांत महादेव गुडेकर, वय 29 वर्ष, गोरेगाव, मुंबई ३) तुषार चंद्रकांत गावडे, वय 22 वर्षे, गोरेगाव, मुंबई
    ४) हर्ष अर्जुन फाळके, वय 19 वर्ष, विरार.
    ५) महेश हिरामण म्हात्रे, वय २० वर्षे, गोरेगाव, मुंबई
    ६) लवकुश रणजीत कुमार प्रजापति, वय 16 वर्ष, गोरेगाव, मुंबई
    ७) शुभम सुभाष गुडेकर, वय 22 वर्षे, गोरेगाव, मुंबई
    ८)ओम मनीष कदम, १८वर्ष, गोरेगाव, मुंबई.
    ९) मुसेफ मोईन खान,वय २१ वर्ष, गोरेगाव, मुंबई

    खाजगी रुग्णालय जाकोटिया रुग्णालय खोपोली जखमीची नावे:-
    १) सनी ओमप्रकाश राघव, वय २१ वर्ष, खोपोली,रायगड.

    Chief Minister Eknath Shinde expresses deep grief over bus accident, 5 lakh aid to kin of deceased; Treatment of the injured at government expense

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस