• Download App
    Devendra Fadnavis शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस NDA मध्ये सामील करून घ्यायला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा नकार!!

    शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस NDA मध्ये सामील करून घ्यायला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा नकार!!

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (NDA) सामील करून घ्यायला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज स्पष्ट शब्दांमध्ये नकार दिला.

    – विनोद तावडे – जयंत पाटील चर्चा

    भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांची मुंबईतल्या पंचतारांकित हॉटेलमध्ये गुप्त चर्चा झाली. त्यामुळे शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेसाठी भाजपा बरोबर यायला तयार असल्याच्या बातम्यांचे पेव फुटले. पण सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांनी या बातम्यांचा इन्कार केला. पण त्याचवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज दिल्ली दौरा झाला.

    केंद्रीय गृहमंत्री अमित शाह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या समवेत त्यांची महत्त्वाची बैठक झाली. त्यामुळे शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस भाजपा बरोबर घेण्यासाठीच देवेंद्र फडणवीस यांनी अमित शाह यांची भेट घेतल्याच्या अटकळी मराठी माध्यमांनी बांधल्या. तशा बातम्या सुद्धा दिल्या. पण देवेंद्र फडणवीस यांची ही दिल्ली भेट नर्मदा प्रोजेक्ट आणि महाराष्ट्राच्या अन्य कामांच्या संदर्भात होती.

    – पवारांचे आमदार, खासदार फोडायचा प्रयत्न नाही

    मात्र, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ताधारी आघाडीतली एन्ट्री विषयीच्या बातम्या देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांमध्ये फेटाळून लावल्या. महाराष्ट्रात सत्ताधारी महायुतीमध्ये (NDA) अन्य कुठल्याही पक्षाला प्रवेश देण्याची शक्यता नाही. जे आमचे मित्र पक्ष आहेत, तेच आमच्याबरोबर महाराष्ट्रात कायम राहतील.

    आम्ही शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि खासदार फोडायचा कधीही प्रयत्न केला नाही, अशा स्पष्ट शब्दांमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (NDA) सामील करून घ्यायला नकार दिला.

    Chief Minister Devendra Fadnavis refuses to induct Sharad Pawar’s NCP into the NDA!!

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    महाराष्ट्रात 8 जुलैपासून राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसात घट; पुढील 10 दिवस हीच स्थिती कायम राहण्याची शक्यता!!

    ढगफुटीचा भोवरा सुरत आणि अहिल्या नगरच्या दिशेने सरकला; नाशिकवरचे संकट टळल्याची शक्यता!!

    Maharashtra TET : टीईटी अट सक्तीविरोधात नऊ जुलैला ‘शाळा बंद’ आंदोलन:शिक्षक संघटनांनी दिला राज्य शासनाला इशारा